News
Typography

झी युवा वाहिनीने नुकताच 'तू अशी जवळी रहा' हा एक वेगळ्या धाटणीचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस आणला. ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची आणि म्हणूनचया मालिकेचं कथानक प्रेक्षकांना भावलं. या मालिकेत राजवीर आणि मनवा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. रविवार ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणाऱ्या १ तासाच्या विशेष भागातहा लग्न सोहळा संपन्न होणार आहे.

Rajveer Manava Wedding Tu Ashi Javali Raha 02

हा लग्न सोहळा अगदी दिमाखदार असणार आहे. दोन्ही परिवार एकत्र येऊन राजवीर आणि मनवा यांच्या आयुष्यातील हा महत्वाचा दिवस खास बनवणार आहेत. लग्न सोहळा हा अगदी रीतसर असून हळद, मेहंदी, संगीत हे कार्यक्रम पार पडणार आहेत. मनवा तिच्या लग्नात मराठमोळ्या पेशवाई लुकमध्ये दिसणार आहे. नववारी साडी, नथ, पेशवाई दागिने आणि मुंडावळ्या यामध्ये मानवच सौंदर्य अगदी खुलून दिसणार आहे.

Rajveer Manava Wedding Tu Ashi Javali Raha 04

मालिकेतील कलाकारांचं बॉण्डिंग इतकं चांगलं आहे की लग्न सोहळ्याचे चित्रीकरण चालू असताना मनवाचे कुटुंबीय खरोखर भावुक झाले. तितिक्षाने बिहाईंड द सिन गॉसिप सांगताना हे हि म्हंटल की मालिकेतील कलाकारांचा एक व्हाट्सअॅप ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर नेहमी मनवाच्या घरच्या सेटवर आणि राजवीरच्या घरच्या सेटवर चाललेल्या मजामस्तीच्या गप्पा होतात.

Rajveer Manava Wedding Tu Ashi Javali Raha 03

हा लग्न सोहळा फक्त एक समारंभ नसून त्यातून एक सुंदर विचार सगळ्यांसमोर मांडण्यात येणार आहे. त्याबद्दल बोलताना तितिक्षा म्हणाली, "या लग्नसोहळ्यातील एक गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली, ती म्हणजे 'कन्यादान' या गोष्टी मागचा मनवाच्या वडिलांचा विचार. मनवाचे वडील मनवाचं कन्यादान करण्यासाठी नकार देतात कारण त्यांच्या मते मुलगी ही कुठली वस्तू नाही आहे जी कोणी दान करावी. जरी राजवीरशी मनवाचं लग्न झालं तरीही मनवा ही शेवट पर्यंत त्यांची मुलगीच राहणार आहे. हा विचार माझ्या मनाला खूप भिडला. कदाचित हा विचार प्रेक्षकांची विचारसरणी देखील बदलू शकेल."

हा लग्न सोहळा साजरा करायला पाहायला विसरू नका 'तू अशी जवळी रहा' मालिकेचा १ तासाचा विशेष भाग ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजता फक्त झी युवावर.

Rajveer Manava Wedding Tu Ashi Javali Raha 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement