News
Typography

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेद्वारे शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ही जोडी प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडत आहे. इतकेच नसून या मालिकेमधून शर्मिष्ठा आणि शशांक केतकर देखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांना या दोघांमधील बहीण भावाच नातं देखील खूप आवडत आहे. प्रेक्षकांची त्यालादेखील पसंती मिळत आहे. सिड आणि संयु यांच्यामधील छोटी मोठी भांडण, सिडचे संयुला समजवणे, त्यांच्या धम्माल मस्ती कुठेतरी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. पडद्यावरच नसून पडद्यामागे देखील यांची बरीच धम्माल मस्ती सुरु असते. मालिकेद्वारे चोवीस तासातला बराचसा वेळ एकत्र रहाता आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखू लागता आणि त्यातून काही सुंदर नाती तयार होतात जी आयुष्यभर तशीच रहातात.

He Mann Baware Shashank Sharmishtha 02

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मधील शशांक केतकर म्हणाला, “शर्मिष्ठा आणि माझी मैत्री या मालिकेमुळे झाली. बिग बॉस मराठीमुळे मला शर्मिष्ठा कळली, खूप energetic आहे, बिनधास्त मुलगी आहे, ज्याच्यावर जीव लावते त्याच्यावर पूर्ण जीव लावते आणि एक मात्र नक्की मी तिच्या आणि ती माझ्या आवडत्या माणसांच्या यादीमध्ये आता हळूहळू येत चाललो आहे. एक गंमतीदार किस्सा झाला, शर्मिष्ठा मला म्हणाली तिने ललितला चार वेळा सिद्धार्थ अशी हाक मारली, त्यावरूनच कळत कि आमचं bonding किती छान झालं आहे. माझ्याबरोबरच नव्हे तर वंदना ताई सोबत देखील खूप छान नातं तिचं तयार झालं आहे. प्रेक्षक मला भेटतात तेंव्हा आवर्जून सांगतात अनु आणि सिड बरोबरच सिड – संयुचे सीन देखील छान होतात” हे ऐकून बरं वाटत."

तसेच यावर शर्मिष्ठा म्हणाली, “शशांक बरोबर काम करायला खूप मज्जा येते. याआधी मी शशांकला नावाने ओळखत होती, पण मालिकेद्वारे एकमेकांना ओळखायची संधी मिळाली. शशांक एक उत्तम अभिनेता आहे, सीन परफॉर्म करताना त्याची खूप मदत होते. त्याची दुसरी बाजू खूप कौतुकास्पद आहे आणि ती म्हणजे त्याचे स्वत:चे हॉटेल आहे जे तो उत्तमरीत्या सांभाळतो. सेटवर देखील तो त्याने तयार केलेल्या बऱ्याच गोष्टी आणतो ज्या अप्रतिम असतात.”

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement