News
Typography

कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये या आठवड्यात येणार आहेत महाराष्ट्राचे लाडके गायक. संगीताचा वारसा लाभलेले दोन लोकप्रिय गायक आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे मंचावर आले. मंचावर बऱ्याच गप्पा रंगल्या तसेच गाणी देखील सादर झाली. राहुल देशपांडे यांनी लहानपणीच्या आठवणी तसेच पु. ल. देशपांडे यांच्या आठवणी देखील सांगितल्या. राहुल आणि आदर्श यांनी मंचावर बरीच धम्माल मस्ती केली. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची यांनी काय उत्तरे दिली तसेच कोणते किस्से ऐकायला मिळतील हे बघणे मोठ्या उत्सुकतेचे असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाचा येत्या आठवड्यातील विशेष भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

राहुल देशपांडे यांना मकरंद अनासपुरे यांनी आनंद आणि प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकली का ? विचारल्यास ते म्हणाले नक्कीच. आनंद शिंदे यांची बरीच गाणी ऐकली आहेत. गणपतीच्या वेळेला मिरवणुकीला जायचो तेंव्हा तिथे यांची गाणी असायची तेंव्हा ऐकली आहेत. आदर्श शिंदने बाप्पा मोरया रे ! या गाण्याच्या दोन ओळी म्हणून दाखविल्या. आदर्श आणि राहुल एकत्र असल्यावर गाणी सादर होणार नाही असे शक्यच नाही. राहुलने देखील बगळ्यांची माळ फुले हे गाण सादर केले. यानंतर प्रश्न उत्तर यांचा खेळ सुरु झाला. आदर्शला कसला राग येतो हे विचारल्यास तो म्हणाला मला कसलाच राग येत नाही आणि आलाच तर मी तिथून निघून जातो. कोणालाही दुखवायला मला आवडत नाही असे तो म्हणाला.

Adarsh Shinde Rahul Deshpande Assal Pahune Irsal Namune 02

चक्रव्यूह राउंड मध्ये आदर्शला सुरेश वाडकर यांच्याविषयी एक आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली असता तो म्हणाला, आवडती गोष्ट म्हणजे “आवाज”. जेंव्हा मी त्यांच्याकडे जायचो तेंव्हा मला नेहेमी वाटायचं असं गाण मला आयुष्यात कधीच जमणार नाही. गाण सोडून दिलेलंच बर. यानंतर आदर्शने सुरेश वाडकर यांचे ए जिंदगी हे गाण म्हणून दाखवल. याच राउंड मध्ये राहुलला प्रशांत दामले यांच्याबाबत आवडती आणि एक खटकणारी गोष्ट विचारली तेंव्हा तो म्हणाला आवडती गोष्ट म्हणजे “सळसळत चैतन्य”. तसेच या दोघांना दोन संवाद दिले जे त्यांना गाण्याच्या चालीत म्हणायचे होते. राहुल देशपांडे यांनी पु.ल.देशपांडे यांची एक सुंदर आठवण प्रेक्षकांना सांगितली आहेत.

राहुल देशपांडे यांनी सांगितले कि, शास्त्रीय संगीतावर घर चालवणं खूप कठीण आहे, कारण ते एका विशिष्ट वर्गाकरता आहे. जेंव्हा राजाश्रय होता तेंव्हा उत्तम होतं पण आता लोकाश्रय मध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील बरोबरीने कराव्या लागतात.

Adarsh Shinde Rahul Deshpande Assal Pahune Irsal Namune 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement