News
Typography

३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत.

‘छोटी मालकीण’ मालिकेत रेवतीचा अपघात झाल्यामुळे श्रीधर पुरता खचलाय. अश्यातच रेवतीचा स्मृतीभंश झाल्यामुळे श्रीधरसोबत आपलं लग्न झालंय ही गोष्टच ती विसरलीय. या गोष्टीचा श्रीधरला प्रचंड मानसिक धक्का बसलाय. रेवतीचं मन श्रीधर कसं जिंकणार? याची रंजक कहाणी ३० डिसेंबरच्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळेल.

Romantic Sunday 30 Dec Star Pravah 02

‘छत्रीवाली’ मध्ये मधुरा विक्रमची लव्हस्टोरी निर्णायक वळणावर येऊन पोहोचलीय. दोघांनीही आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिलीय. आता प्रतीक्षा आहे ती मधुराच्या आईच्या होकाराची. मधुराच्या आईला म्हणजेच होणाऱ्या सासुबाईंना विक्रम कसं मनवणार? हे पहाणं उत्सुकतेचं असेल.

Romantic Sunday 30 Dec Star Pravah 03

‘ललित २०५’ मध्ये राजाध्यक्ष कुटुंबावर संकटांची मालिका अखंड सुरुच आहे. राजाध्यक्ष कुटुंबावरचं संकट दूर करण्यासाठी भैरवी पुढाकार घेत असली तरी आता ती खूप मोठ्या पेचात अडकलीय. ऋषभने ठेवलेल्या एका जाचक अटीमुळे भैरवीला आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागणार की काय अशी परिस्थीती निर्माण झालीय. राजाध्यक्ष कुटुंबावरचं संकट दूर करण्यासाठी भैरवी टोकाचं पाऊल उचलणार का? याचं कोडं महाएपिसोडमध्ये उलगडणार आहे.

३० डिसेंबरला सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत हे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत. तेव्हा पाहायला विसरु स्टार प्रवाहचा रोमॅण्टिक सण्डे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement