News
Typography

छोट्या पडद्यावर सध्या 'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावे आणि नवोदित अभिनेत्री गायत्री दातार मुख्य भूमिका साकारत आहे. ईशा आणि विक्रांत सरंजामे यांची अनोखी प्रेमकहाणी सगळ्यांना पसंत पडत आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. वय विसरायला लावणारं प्रेम ही संकल्पना असलेली मालिका आता एका महत्वपूर्ण टप्प्यावर आली आहे. सध्या मालिकेत विक्रांत आणि ईशा म्हणजेच विकीशाच्या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे.

विक्रांतने ईशाला लग्नाची मागणीदेखील एका वेगळ्या आणि शाही पद्धतीने घातली, त्यामुळे त्यांचा लग्नसोहळा देखील तितकाच दिमाखदार असणार यात शंकाच नाही. सध्या सगळीकडे विक्रांत आणि ईशा यांच्या शाही लग्नपत्रिकेची चर्चा चालू आहे. नुकतंच मालिकेत देखील या आगळ्या वेगळ्या लग्नपत्रिकेची झलक पाहायला मिळाली. हि पत्रिका चांदीच्या पत्र्यावर कोरलेली आहे. पत्रिकेसोबत एक सोन्याचा गणपती, चांदीचा करंडा, अत्तरदाणी, दिवा आणि मोती आहेत. ही एक लग्न पत्रिका १.५ लाखांची आहे. इतकंच नव्हे तर लग्नाच्या आमंत्रणासोबत आमंत्रकांना पोशाख आणि काही भेटवस्तू देखील देण्यात येणार आहेत.

संगीत, मेहंदी, हळद, साखरपुडा आणि विवाहसोहळा भोरमध्ये अगदी धुमधडाक्यात आणि शाही अंदाजातपार पडणार आहे. आता आमंत्रण जर इतकं शाही असेल तर विवाह सोहळा किती भव्य असेल याची कल्पना देखील आपण करू शकतो.

तेव्हा ईशा आणि विक्रांत म्हणजेच विकिशा यांच्या लग्नाचा दिमाखदार सोहळा अनुभवायला आणि या नवं दाम्पत्याला आपले शुभाशीर्वाद द्यायला लग्नाचा मुहूर्त चुकवू नका १३ जानेवारी संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Tula Pahate Re Marathi Serial 02

 

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement