News
Typography

कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली, एकामागोमाग एक घडत जाणाऱ्या रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, रूढी, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेली ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर १४ जानेवारी पासून रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नाईकांच्या वाड्यातील घडणाऱ्या घटनांचे रहस्य कसं उलगडणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

रात्रीस खेळ चाले मधील 'ता इसरलंय..' हा संवाद आणि तो संवाद बोलणारा पांडू अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या संवादामुळे घराघरांमध्ये पोहोचलेला लेखक अभिनेता प्रल्हाद कुरतडकर हा 'रात्रीस खेळ चाले'च्या दुसऱ्या भागाचं देखील लेखन करत आहेत. काय असेल भीतीचं नवं रूप? काय असेल वाड्यात दडलेलं नवं गूढ? नवीन पात्र पाहायला मिळतील कि असेल जुन्या पात्रांची नवीन गोष्ट? या सर्व प्रश्नांचा उलगडा करत प्रल्हाद म्हणाले, "लोकांना आवडणारी पात्रं, भीती, मजा ही असणारच आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. लतिका सावंत आणि राजू घाग यांनी माझ्यासोबत ही कथा लिहिली आहे. मी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. राजू सावंत हे या मालिकेचं दिग्दर्शन करत आहेत. दुसरा भाग म्हणजे जबाबदारी वाढलेली आहे. आमची संपूर्ण टीम ही जबाबदारी पेलण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेची कथा इतकी सस्पेन्स आहे कि आता त्याचा दुसरा भाग येतोय म्हटल्यावर प्रेक्षक स्वतःच त्यांना वाटेल त्या बाजूने कथेचा विचार करायला लागले आहेत. ते स्वतः कथा तयार करत आहेत. आम्हाला खूप मजा येतेय. पुन्हा आम्ही त्याच नाईकांच्याच वाड्यावरच चित्रीकरण करत आहोत."

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement