News
Typography

मॉनिटर बनला राजगायक. सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये पहिल्यांदाच मॉनिटरला देण्यात आली कट्यार आणि महेश काळे यांनी दिली कट्यार आणि तो बनला राजगायक.

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामध्ये छोट्या सुरवीरांच्या गाण्याने अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या प्रेमात पाडले आहे. याचबरोबर या सूरविरांसोबतच महाराष्ट्राचे मन जिंकले आहे ते म्हणजे सगळ्यांच्या लाडक्या हर्षदने. मॉनिटर म्हणून तो संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांचाच लाडका बनला आहे. त्याने आजवर मंचावर आलेल्या प्रत्येक पाहुण्यांची मने जिंकली आहे. सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर या कार्यक्रमामध्ये हर्षद राजगायक बनला असून त्याला कट्यार देखील मिळाली आहे.

Harshad Naybal Becomes RajGayak 01

सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर कार्यक्रमामध्ये हर्षद कधी सांता क्लॉज बनला आणि त्याने छोट्या सुरवीरांना, कॅप्टन्सना गिफ्ट दिले. तर कधी मावळा बनला, कधी प्रोफेसर धोंड, तर कधी लाल्या बनला तर कधी DJ बनला, तर मंचावर हर्षद कधी माऊली बनून आला आणि खोट्या विटांची भिंत तोडून जबरदस्त एन्ट्री घेतली आणि काही डायलॉगस देखील म्हंटले. अशी त्याची अनेक रूपं महाराष्ट्राने आजवर पाहिली आहेत. सूर नवा ध्यास नवा छोटे सूरवीर या कार्यक्रमामुळे तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहचला आहे.

आता नेमकं काय घडलं हे बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवीरमध्ये Voot वर.

Harshad Naybal Becomes RajGayak 02

Harshad Naybal Becomes RajGayak 03

0.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.50 (2 Votes)
Related Article You May Like
Advertisement