News
Typography

स्टार प्रवाहवरील ललित २०५ मालिकेमध्ये मकर संक्रांत साजरी होणार आहे. भैरवीची पहिलीच संक्रांत असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात जल्लोष पाहायला मिळतोय. काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांनी भैरवीचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. भैरवीप्रमाणेच राजाध्यक्षांच्या इतर सुनाही नटून थटून तयार होत्या. तिळाचे लाडू, पतंग उडवण्याची चुरस आणि गुळपोळीचा खात बेत संक्रांतीच्या सणासाठी आखण्यात आलाय. संक्रांतीला हळदीकुंकू आणि वाण लुटण्याची प्रथा आहे. भैरवीने वाण म्हणून तुळशीचं रोपटं देत पर्यावरण रक्षणाच्या हेतूने पुढे पाऊल टाकलं.

Lalit 205 Makar Sankrant Celebrations 04

‘मराठी संस्कृतीत सणावारांना विशेष महत्त्व आहे. यानिमित्ताने केली जाणारी व्रतवैकल्य आपल्याला निसर्गाशी जोडत असतात. हेच महत्व लक्षात घेऊन तुळशीचं रोप देण्याची अनोखी संकल्पना आम्हाला सुचली आणि आम्ही ती अंमलात आणली अशी भावना भैरवी म्हणजेच अमृता पवारने व्यक्त केली.’

राजाध्यक्ष कुटुंबातलं हे अनोखं सेलिब्रेशन पाहायला विसरु नका १५ जानेवारीला रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Lalit 205 Makar Sankrant Celebrations 03

Lalit 205 Makar Sankrant Celebrations 02

Lalit 205 Makar Sankrant Celebrations 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement