News
Typography

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेला वेगळेच वळण मिळाले आहे. अनुची चिंता दूर झाली आहे कारण तिला आता जॉब लागला आहे. प्रणयला याबाबत कुठलीही कल्पना नाही. परंतु त्याला कुठेतरी ही शंका आहे कि, सिध्दार्थ ज्या कंपनीचा मालक आहे त्या कंपनीमध्येच अनुला नोकरी मिळाली आहे. अनुच्या वाईटावर असलेला प्रणय अनुला दुर्गाच्या मनातून उतरवण्यासाठी आणि दुर्गाच्या मनात अनु विषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी थेट दुर्गाच्या ऑफिस मध्ये जाऊन पोहचतो. दुर्गाला तो अनुविषयी बऱ्याच वाईट गोष्टी सांगतो. ईतकेच नसून यावेळेस दुर्गासमोर सिध्दार्थचे सत्य देखील येते.

जेंव्हा प्रणय दुर्गाला सांगतो कि, तुमचा मुलगा सिद्धार्थ आणि अनुमध्ये खूप चांगली मैत्री झाली आहे. सिद्धार्थने अनुपासून त्याची ओळख लपवली असून तो हरी बनूनच अनुला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सत्य दुर्गासमोर आल्यावर तिचा विश्वास बसत नाही. सिध्दार्थ आणि अनुमधले नातं तोडण्यासाठी दुर्गा एक कट रचते. अनु आणि सिद्धार्थ मध्ये दुरावा आणण्यासाठी दुर्गाने रचलेली खेळी यशस्वी होईल का ? अनु आणि सिद्धार्थ मध्ये दुरावा येईल का ? सिद्धार्थ अनुला त्याची बाजू समजवू शकेल का ? अनुच्या घरी विशाखाच्या वाढदिवसाची तयारी सुरु असताना दुर्गा मिठाचा खडा टाकणार का ? हे बघायला विसरू नका सुखाच्या सरींनी हे मन बावरे मध्ये रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

दुर्गाला अनु अजिबात आवडत नसल्याने आणि अनुबद्दल दुर्गाच्या मनामध्ये पहिल्यापासून असलेले गैरसमज या सगळ्यामुळे त्या दोघांमध्ये असलेले मैत्रीचे नाते दुर्गाला खटकत आहे. पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच रंजक घटना बघायला मिळणार आहेत. दुर्गाला हे माहिती आहे कि, जर तिने सिध्दार्थला अनु पासून तोडण्याचा प्रयत्न केला तर सिध्दार्थ तिच्या विरोधात जाऊ शकतो. आणि म्हणूनच दुर्गा अनुला सिध्दार्थचे सत्य लवकरच सांगणार आहे कि, तो हरी नसून सिद्धार्थ म्हणजेच तिचा मुलगा आहे.

अनुला हे सत्य कळल्यावर ती कुठलं पाउल उचलेल ? तिला हे सत्य कळताच ती सिध्दार्थशी तिचे असलेले नाते तोडेल का ? हे बघायला विसरू नका सुखाच्या सरींनी हे मन बावरे मध्ये रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement