News
Typography

छत्रीवाली मालिकेत विक्रम आणि मधुराचं नातं निर्णायक वळणावर येऊन पोहोचलंय. मधुरा आणि विक्रमच्या लग्नाची बोलणी सुरु असतानाच या दोघांच्या नात्यात नीलमची एण्ट्री झाली. विक्रमचं मधुरावर जीवापाड प्रेम असलं तरी विक्रमचं लग्न नीलमशी व्हावं ही विक्रमच्या आईची अंतिम इच्छा होती. त्यामुळे विक्रमचा साखरपुडा नक्की नीलमशी होणार की मधुराशी याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय.

Chhatriwali Vikram Engagement 02

गायकवाड कुटुंबाने विक्रमच्या साखरपुड्याची जोरदार तयारी सुरु केलीय. या अनोख्या सोहळ्यासाठी दोन खास पाहुण्यांनाही आमंत्रण देण्यात आलंय. ऋषी सक्सेना आणि सायली संजीव विक्रमच्या साखरपुड्यामध्ये खास हजेरी लावणार आहेत.

तेव्हा पाहायला विसरु नका छत्रीवाली मालिकेचा हा विशेष एपिसोड. शनिवार २६ जानेवारीला फक्त स्टार प्रवाहवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement