News
Typography

स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपलंय. नकार-होकाराचं नाट्य रंगल्यानंतर मधुरा-विक्रमचा साखरपुडा तर पार पडला. आता उत्सुकता आहे ती दोघांच्या लग्नाची.

विधीवत लग्न व्हावं ही मधुराच्या घरच्यांची इच्छा आहे, तर विक्रमच्या घरच्यांनी मात्र डेस्टिनेशन वेडिंग, ग्रॅण्ड रिसेप्शन असे बरेच प्लॅन्स केलेत. त्यामुळे दोन्ही कुटुंबात पुन्हा एकदा तू तू मैं मैं रंगणार हे वेगळं सांगायला नको. घरच्यांची मनं सांभाळत हे दोघं आपलं नातं कसं निभावणार? याची रंगतदार गोष्टी ‘छत्रीवाली’च्या महाएपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे.

त्यासाठी पाहायला विसरु नका ‘छत्रीवाली’ मालिकेचा महाएपिसोड रविवार १० जानेवारीला दुपारी १ आणि रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News