News
Typography

झी युवा ने २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला 'वर्तुळ' ही नवी मालिका सुरु केलीं होती . नावाप्रमाणेच ही मालिका माणसाच्या आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. विकास पाटील , विजय आंदळकर आणि जुही गडकरी यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स स्टोरी आहे. मालिकेचं कथानक अगदी रंजक असून, ही कथा मीनाक्षी नावाच्या एका अनाथ मुलीची आहे जिचा भूतकाळ तिच्या भविष्यकाळात डोकावतोय.

जुई गडकरी बऱ्याच काळानंतर एका तगड्या भूमिकेद्वारे या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस आली. जुई मीनाक्षीची या पात्राची भूमिका साकारत आहे. तर अभिजित परांजपे म्हणजे अभिनेता विकास पाटील हा कथेचा नायक आहे. मिनाक्षी आणि अभिजितची भेट अपघाताने होते. अभिजित मीनाक्षीला स्वतःच्या घरी घेऊन जातो. कालांतरानें त्या दोघांमध्ये प्रेम होते आणि आता येत्या रविवारी १० फेब्रुवारीला रात्री ९ वाजता वर्तुळ या मालिकेचा महा एपिसोड दाखवला जाणार आहे. यात मीनाक्षी आणि अभिजीत चे लग्न मोठ्या थाटामाटामध्ये घडणार आहे. या लग्नात हळदी , संगीत सगळंच असणार आहे . या लग्नात फुलपाखरू चे कलाकार त्याचप्रमाणे सूर राहू दे चे कलाकार सुद्धा नवजोड्याला शुभेच्छा द्यायला येतील. फुलपाखरू मधील मानस या संगीत मध्ये एक सुंदर गाणं गाणार आहे.

तसं पाहता मीनाक्षीने तिच्या भूतकाळातील काही गोष्टी तिच्या मनात दडवून ठेवल्या होत्या, मात्र आता तिने तीचं आयुष्य मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून अभिजीत ला पाठवले आहे. पण अजूनही अभिजीत ने तो ऑडिओ ऐकला नाही आहे. या लग्नात काही भयंकर घडेल का ? तिचा भूतकाळ तिच्यासमोर येईल का ? अभिजीत सोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला मिनाक्षीच्या भूतकाळाने तडा जाणार का? त्यांचं नातं टिकून राहणार का? असे असंख्य प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात उठत आहेत.

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 01

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 02

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 03

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 04

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 05

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 06

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 07

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 08

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 09

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 10

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 11

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 12

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 13

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement