News
Typography

झी मराठीवरील 'तुला पाहते रे' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नाते तयार झाले आहे. मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आणि प्रेक्षकांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे प्रत्येक आठवड्यात मालिका टि.आर.पी. चे उच्चांक गाठत आहे. या मालिकेमधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होती. सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा धुमधडाक्यात संपन्न झाला. निमकरांची इशा सरंजामेंच्या मोठ्या घरात लग्न करून आली आणि रुळली.

Tula Pahate Re Marathi Serial 05

सगळं चांगलं चालू असताना आता मालिका एक रंजक वळण घेणार आहे. मालिकेतील जालिंदरची व्यक्तिरेखा वेगवेगळ्या पद्धतीने ईशाला वेळोवेळी सावध करताना प्रेक्षकांनी पाहिली आहे. मालिकेचा नुकताच एक प्रोमो रिलीज झाला आणि त्यामुळे जालिंदरच्या म्हणण्यात तथ्य आहे कि काय अशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण होईल. या प्रोमोमध्ये विक्रांतचा एक वेगळाच चेहरा प्रेक्षकांच्या समोर आला. विक्रांतने त्याच्या स्वार्थासाठी ईशाशी लग्न केल्याचं समोर येतं. पण विक्रांतने असं का केलं? त्याच्या अशा वागण्याचं कारण काय आहे? यासगळ्यामागे त्याचा स्वार्थ काय आहे? या सर्व प्रश्नांचा उलगडा मालिकेच्या येत्या काही भागात होईल आणि हे पाहणं खूप रंजक ठरेल यात शंकाच नाही.

1.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 1.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement