News
Typography

हल्लीच्या स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने सगळ्याच क्षेत्रात अव्वल असावं या अपेक्षेपायी पालकांकडून त्यांचं बालपणच हिरावून घेतलं जातं. आज हा क्लास तर उद्या तो क्लास. तारेवरची ही कसरत करताना मुलं कमी पडली तरी ओरडा बसतो. पालकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली ही मुलं दबून गेली आहेत. या सगळ्यामुळे नकळत पालक - मुलांमध्ये एक दरी निर्माण झाली आहे.

H M Bane T M Bane Parenting Lesson 02

सातत्याने वेगळे विषय हाताळत समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनी मराठीने हम बने तुम बने च्या एका भागात याच विषयाभोवती मालिकेची कथा गुंफली आहे. जिथे कमी मार्क मिळाले, आता घरी ओरडा पडणार म्हणून रेहा सईच्या रिपोर्ट कार्डवर तिच्या बाबांची खोटी सही करते. ही गोष्ट घरी कळल्यावर तुलिका सईवर चिडते. हर्षदाचा संताप अनावर होतो आणि ती रेहावर हात उगारते तर दुसरीकडे आईसाहेब मुलांवर हात उचलल्यामुळे आपल्या सूनांवर चिडतात.

या एकंदर गोष्टीचा शेवट काय होणार? कमी मार्क मिळालेला रिपोर्ट कार्ड आपल्याला दाखवताना आपल्या मुलीला भिती का वाटली? आपल्यातला संवाद कमी झाला आहे का? नात्यांमध्ये वाढलेलं अंतर बने कुटुंबीय कमी करू शकणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी नक्की पहा येत्या ७ फेब्रुवारीला ह.म.बने तु.म.बने, एक तासाचा विशेष भाग रात्री १० वाजता, फक्त सोनी मराठीवर

H M Bane T M Bane Parenting Lesson 03

H M Bane T M Bane Parenting Lesson 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement