News
Typography

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये अनेक घटना घडत आहेत. मल्हारच्या आयुष्यातून आर्वीचे अचानक निघून जाणे, तिच्या मृत्यूची बातमी येणे. लक्ष्मी आणि आर्वीचं नातं खूप जवळच होतं आणि त्यामुळे आर्वी ताई कायमच्या निघून गेल्या आहेत यावर लक्ष्मीचा विश्वास बसत नाहीये. तिला कुठेतरी खात्री आहे कि, आर्वी ताई परतणार आहे. हे सगळ घडत असतानाच मालिकेमध्ये केतकी चितळेची एन्ट्री होणार आहे. अक्काच्या मैत्रिणीची मुलगी अबोली म्हणजेच केतकी चितळे ही लवकरच मल्हारच्या घरात येणार असून, तिच्या येण्याने मालिकेला कोणते नवे वळण मिळणार हा प्रश्न प्रेक्षकांना पडणार आहे. तेंव्हा नक्की बघा लक्ष्मी सदैव मंगलम् संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लक्ष्मी आणि मल्हाचं नात एका नाजूक वळणावर येऊन पोहचले आहे. अक्कांना हे पहिल्यापासूनच माहिती आहे, मल्हारच्या मनामध्ये लक्ष्मीबद्दल प्रेमाची भावना आहे. परंतु, हे अजून अजिंक्यला माहिती नाही. अबोली घरामध्ये आल्यानंतर अजिंक्यला इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी ती घेणार आहे. हे होत असतानाच अजिंक्य आणि अबोलीची मैत्री देखील होणार असून दुसरीकडे मालिका रंजक वळणावर पोहचणार आहे कारण अबोली आणि मल्हार मध्ये देखील मैत्री होणार आहे. आता मालिकेमध्ये अबोलीच्या येण्याने लक्ष्मी, मल्हार आणि अजिंक्यच्या आयुष्यात कोणते बदल होतील ? अबोलीच्या येण्याने मालिकेला कोणते नवे रंजक वळण मिळणार ? अबोलीचे घरात येणे लक्ष्मीसाठी चांगले असेल कि वाईट ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

तेंव्हा नक्की बघा 'लक्ष्मी सदैव मंगलम्' संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Ketaki Chitale As Aboli in Laxmi Sadaiva Managalam 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement