News
Typography

कुठे भेटलात दोघं? कसं जमलं? तुमच्या मिस्टरांना कशी हाक मारता? कुणी कुणाला आधी लग्नासाठी विचारलं? दोघांपैकी कोण जास्त चिडतं? मिस्टर फिरायला नेतात का? असे खुमासदार प्रश्न विचारत घराघरात रंगणाऱ्या होम मिनिस्टरचा फॅनक्लब चांगलाच वाढला आहे. गेली १४ वर्ष हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या घराघरात पोहोचला असून सगळ्यांचं अविरत मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातील वहिनींपासून ते सेलिब्रिटी सौभाग्यवतींना बोलतं करणाऱ्या या होम मिनिस्टरमध्ये सज्ज होणार आहेत आनंदी गोपाळ.

झी स्टुडिओज प्रस्तुत आनंदी गोपाळ या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाचे डायरेक्टर, ऍक्टर आणि भावोजी यांची मैफिल येत्या रविवारी २ तासाच्या विशेष भागात रंगणार आहे. आनंदी गोपाळ या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेली जोडी म्हणजेच अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद आणि चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वंस व त्यांच्या सौ हे या पैठणीच्या खेळात सहभागी होणार आहेत. भावोजीसोबत गप्पा टप्पा आणि पैठणीसाठी असलेला चुरशीचा खेळ असा हा विशेष भाग रंगणार आहे.

त्यामुळे पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा २ तासाचा विशेष भाग १० फेब्रुवारी रविवारी संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Anandi Gopal on Home Minister 03

Anandi Gopal on Home Minister 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement