News
Typography

मनोरंजनाचे दुसरे नाव म्हणजे झी युवा वाहिनी. सध्या प्रेक्षकांना घरी बसून नियमितपणे सोमवार ते शनिवार ७ ते १० च्या दरम्यान रोज संध्याकाळी तू अशी जवळी राहा, सूर राहू दे, वर्तूळ, फुलपाखरू, आम्ही दोघी आणि अप्सरा आली असे कार्यक्रम झी युवावर पाहण्याचे ठरलेले असते . मात्र रविवारी काय करावं हे त्यांना कळत नसतं. मग उगाच रीमोटचा चाळा करत हे प्रेक्षक जे मिळेल ते पाहतात आणि स्वतःचे मनोरंजन करतात. याच गोष्टीचा विचार करुन या रविवारी झी युवा घेऊन येतंय मनोरंजनाचा महारविवार.

१० फेब्रुवारीची संध्याकाळ ही मनोरंजनाचा महारविवार म्हुणून यापुढे ओळखली जाईल. या महा रविवारची सुरुवात संध्याकाळी ७ वाजता तू अशी जवळी राहा या राजवीर आणि मनवा यांच्या अनोख्या प्रेमकहाणीने होईल. त्यांनतर रात्री ८ वाजता फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेही च्या बाळाच्या बारश्याचा महत्वाचा प्रसंग आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनतर रात्री ९ वाजता अभि आणि मीनाक्षी यांच्या आयुष्यातील अनपेक्षित कलाटणी असलेली मालिका वर्तूळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सध्या या तिन्हीही मालिका प्रेक्षकांमध्ये अतिशय प्रचंड प्रसिद्ध असल्यामुळेच झी युवा वाहिनी १० फेब्रुवारीला 'मनोरंजनाचा महारविवार ' प्रेक्षकांच्या आग्रहातर दाखवत आहे.

Rajveer Manava Wedding Tu Ashi Javali Raha 06

७ वाजता तू अशी जवळी राहा या मालिकेमध्ये राजवीर आणि त्याचे मनवावर असलेले वेडे प्रेम आपल्याला पाहायला मिळते. सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे हे दोघे या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये आहेत. राजवीर मनवावर एवढं प्रेम करतोय की तिच्या आयुष्यातील दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा सहवास सहन होत नाही आहे. अगदी तिचं कुटुंब सुद्धा त्याला नको आहे मात्र मनवा त्याच्यावर करत असलेल्या प्रेमापोटी तो जमेल तितकं सगळ्या गोष्टी सांभाळत आहे. महारविवारी मनवा चा डान्स परफॉर्मन्स आणि त्यानंतर होणाऱ्या नाट्याची मजा अनुभवायला मिळणार आहे.

८ वाजता फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेही या दोघांच्या महाविद्यालयीन प्रेमापासून आता लग्न आणि त्यानंतर झालेल्या बाळाची कथा सांगण्यात आली आहे. यशोमान आपटे आणि हृता दुर्गुळे हे दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या महारविवारी आपल्याला मानस वैदेहीच्या बारशाची तयारी, बाळाचं नाव आणि मानस वैदही च स्वप्नातील गाणं आपलयाला पाहायला मिळणार आहे. मानस आणि वैदेहीने आपलं बाळ शाल्मलीला देण्याचा निर्णय आणि हे दोघे आपलं बाळ शाल्मली ला देणार का याबद्दलची उत्कंठा आपल्याला पाहायला मिळेल.

Jui Gadkari Vikas Patil Serial Vartul Marriage Photo 10

९ वाजता वर्तूळ मालिकेतील मीनाक्षी तिला असलेला एक वाईट भूतकाळ म्हणजेच विक्रम आणि अभिच्या दृष्टीने भविष्यात येणारी सुखाची चाहूल या अतिशय उत्कृष्ट कथानकेवर ही मालिका पुढे सरकते. विकास पाटील , विजय आंदळकर आणि जुई गडकरी यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. अभि आणि मिनाक्षीचं लग्न आणि त्यात विक्रम एन्ट्री करणार का ? हा सध्याच्या मालिकेमधील महारविवार आपलयाला पाहायला मिळेल. संगीत, हळद आणि मग लग्न यातील गम्मत जमत प्रेक्षक अनुभवतील. या एपिसोड मध्ये झी युवा वाहिनीवरील इतर कलाकार सुद्धा तुम्हाला वर्तूळ मालिकेतील या भव्य लग्नात दिसतील आणि त्याचबरोबर विक्रम चा थरार आणि कथानकात होणारे ट्विस्ट प्रेक्षकांना मालिकेत अडकवून ठेवेल.

या तिन्ही मालिका सध्या मनोरंजनाने भरलेल्या असून हा महारविवार प्रेक्षकांना आवडेल यात शंकाच नाही.  मनोरंजनाचा महारविवर १० फेब्रुवारीला झी युवावर पाहायला चुकूनही विसरू विसरू नका.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement