News
Typography

रेडू .. हे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात काय विचार येतो ? नाही समजतं आहे ना ? रेडू म्हणजे रेडिओ चा शॉर्टफॉर्म किंवा प्रेमात ठेवलेलं नाव. ‘रेडू’ हा एक चित्रपट असून संपूर्ण चित्रपट मालवणी भाषेत आहे . या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीज वर येत्या रविवारी १० तारखेला संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळेल . रेडू’ म्हणजे ‘रेडियो’. रेडियोवर अमाप प्रेम करणाऱ्या ७० च्या दशकातील एका सामान्य ग्रामीण युवकाची कथा या सिनेमात मांडण्यात आली आहे. त्याकाळी खेडेगावात टीव्ही पोहोचला नसल्यामुळे रेडिओला अधिक महत्व होते. ज्याच्या घरात रेडिओ ते घर श्रीमंत अशी जनमानसात समजूत होती आणि त्यामुळेच ‘रेडू’ बद्दलची ग्रामस्थांमधील उत्सुकता आणि कुतूहल विनोदी पद्धतीने या सिनेमात मांडण्यात आली आहे.

हा मालवणी बोलीतील एवढ्या मोठ्या स्केलवरील एकमेव चित्रपट आहे. मालवणी व्यक्तिरेखा अनेक मालिका, नाटक व चित्रपटांमधून अनुभवायला मिळतात. मात्र, त्या भडक आणि विनोदी असतात. रेडू हा चित्रपट त्या पलीकडे जातो. रेडू एका मालवणी माणसाची साधी निरागस गोष्ट सांगतो. कोकणाचा खराखुरा, निसर्गरम्य अनुभव देतो. अनेक कलाकार हे मालवणमधील स्थानिक कलाकार आहेत. त्यामुळे एक रॉनेस या चित्रपटात आहे. आज आपल्या हातात मोबाईल असतो, पण मोबाईलमध्ये व्यवहार भावनेपेक्षा अधिक असतो. रेडिओ हे सत्तरच्या दशकातील भावनेचं माध्यम होतं. हे आजच्या तरुणाईला पटवून देणारा हा चित्रपट आहे. रेडिओ वर या आधी तामिळ भाषेत चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामुळे रेडू हा भारतातील दुसरा रेडिओवर आधारित चित्रपट आहे आणि मराठीतील (मालवणी भाषेतला) पहिला आहे. तसं पाहता कोकण म्हटलं की पाऊस, आंबा, दशावतार हे सगळं येतं पण ह्या चित्रपटात एक वेगळी गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी देखील काही मजेशीर किस्से घडले. जसं चित्रपटात रेडू म्हणजेच रेडिओ हरवतो तसंच चित्रीकरणाच्या वेळी सेटवर देखील हा रेडिओ हरवला होता आणि सर्वजण हा रेडिओ जवळजवळ दिड ते २ तास शोधात होते. त्यावेळी चित्रपटाचं शूट देखील थांबलं होतं आणि जेव्हा तो रेडिओ मिळाला तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावले. त्यामुळे चित्रपटात असलेला प्लॉट चित्रपटाच्या टीमने आधीच अनुभवाला होता.

येत्या रविवारी, १० फेब्रुवारीला झी टॉकीजवर 'रेडू' या सुपरहिट चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement