News
Typography

महाराष्ट्राच्या जनतेला, हास्य जत्रेत सामिल झालेल्या प्रेक्षकांना, जजेस् आणि पाहुणे कलाकारांना पोट धरुन आणि मनमोकळेपणाने हसायला लावणारा आणि अव्वल स्थानावर असणारा कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व २’. या कार्यक्रमात एखादा छोटाशा चुटकुला, सॉलिड कॉमेडी पंच कधी अचानकपणे हास्याचा धमाका करेल याचा नेम नाही. प्रेक्षकांनी विचार केले नसतील असे अनेक प्रसंग विनोदी बनवून त्यावर उपस्थित कलाकारांकडून टाळ्या, शिट्ट्या आणि वाह! वाह! अशी दाद कशी मिळवावी हे महाराष्ट्राचे विनोदवीर यांना अचूक ठाऊक असते.

Maharashtrachi Hasya Jatra Luckee Team 02

वेगवेगळ्या विषयांच्या आणि थीमच्या आधारावर कॉमेडी स्किट्स सादर करुन झाल्यावर येत्या आठवड्यात नेमकी कोणती थीम पाहायला मिळणार याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष हमखास असणार. तर पुढील आठवड्यात ‘प्रवास’/ ‘ट्रॅव्हल’ ही थीम असणार आहे. प्रवास केल्यावर प्रवासवर्णन अनेकांनी केलंय पण या विनोदी कलाकारांचा प्रवास आणि ठिकाण हे दोन्ही मनोरंजक असणार आहेत. विशेष म्हणजे या थीमचा आनंद लुटण्यासाठी ‘लकी’ या मराठी सिनेमाची टीम उपस्थित होती. ‘ट्रॅव्हल’ थीमवर आधारित कॉमेडी स्किट्सने दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेत्री दिप्ती सती आणि अभिनेता अभय महाजन या कलाकारांचे भरपूर मनोरंजन केले.

Maharashtrachi Hasya Jatra Luckee Team 03

पर्यटकांसाठी किंवा प्रेक्षकांसाठी प्रवास ही खास गोष्ट असते पण या कार्यक्रमातील कलाकारांचा प्रवास हा अगदी लक्षात राहण्यासारखा आहे. जसे की बस डेपो, एव्हरेस्ट चढण्याचा प्लॅन, ५ मिनिटांची लाँग राईड आणि बरंच काही. प्रवास या विषयावर मजेशीर पण काहीतरी घडू शकते हे पाहण्याचा योग आल्यामुळे ‘लकी’ सिनेमाची थीम लकी ठरली आणि संजय जाधव, दिप्ती-अभय यांनी पण एक अन् एक कॉमेडी पंचेस् बिनधास्तपणे एन्जॉय केले.

तुम्ही पण या प्रवासात सहभागी होऊ शकता. तर नक्की पाहा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व २’ सोनी मराठीवर.

Maharashtrachi Hasya Jatra Luckee Team 04

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement