News
Typography

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. शिवरायांच्या शौर्याच्या कथा ऐकताना आणि वाचताना ऊर अभिमानाने भरुन आल्याखेरीज रहात नाही. शिवरायांनी स्वराज्याच्या स्थापनेसाठी एकाहून एक सरस हिरे शोधून काढले. त्यातलाच एक अनमोल हिरा म्हणजे कोंडाजी फर्जंद. कोंडाजी फर्जंद या योद्धयाने साठ मावळ्यांच्या मदतीने अडीच हजार मुघल सैनिकांचा पराभव केला आणि पन्हाळगडाची मोहीम साडेतीन तासांत फत्ते केली. कमी मनुष्यबळ आणि उपलब्ध युद्धसामग्रीच्या बळावर शत्रूवर विजय मिळवून युद्ध जिंकल्याची ही एकमेव ऐतिहासिक घटना मानली जाते. कोंडाजी फर्जंद यांच्या पराक्रमाची गाथा ‘फर्जंद’ सिनेमातून मांडण्यात आलीय. या ऐतिहासिक सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. १७ फेब्रुवारीला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर हा सिनेमा पहाता येईल.

अभिनेता चिन्मय मांडलेकरने या सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून अभिनेता अंकित मोहन याने कोंडाजी फर्जंद साकारण्याचं आव्हान पेललं आहे. यासोबतच मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, निखिल राऊत, आस्ताद काळे, हरिश दुधाडे यांच्या फर्जंदमध्ये मुख्य भूमिका आहेत. दिग्पाल लांजेकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘फर्जंद’ सिनेमाच्या निमित्ताने शिवकालीन इतिहास जिवंत होणार आहे. तेव्हा पाहायला विसरु नका फर्जंद सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर १७ फेब्रुवारीला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement