News
Typography

कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये अक्षय आणि अमृताच्या आयुष्यात बऱ्याच घटना घडत आहेत. घाडगे सदन मध्ये नुकत्याच अक्कांमुळे पुन्हा एकदा अमृता आणि अक्षय नवरा बायको म्हणून वावरू लागले आहेत. . कारण कियारा आणि अक्षयचे लग्न झाले आहे याची माहिती अक्कांना नव्हती. घरामध्ये विभागणी, इतके वर्ष जोडून ठेवलेले कुटुंब अचानक तुटलं त्यामुळेच माई आणि अण्णाच खचून जाणं, कियारा गरोदर असणे... या सगळ्यातच मालिकेमध्ये आता एक वेगळे वळण येणार आहे. कियारा गरोदर नाही याची खात्री अक्कांना पटलेली आहे आणि अक्का हे सत्य आता अक्षयला सांगणार आहेत. मालिकेमध्ये आता पुढे काय होईल ? अक्षय कियाराचे सत्य घरच्यांना सांगू शकेल ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा घाडगे & सून रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Kiyara Truth Ghadge and Suun 02

कियाराने घाडगे परिवाराला इतके दिवस अंधारात ठेवले आहे कि ती गरोदर आहे. या बातमीने सगळं घाडगे कुटुंब खुश आहे. परंतु अक्कांना मात्र पहिल्यापासूनच कियारा गरोदर आहे यावर शंका आहे. कियाराच वागण-बोलण, घरात वावरण या सगळ्या गोष्टी याकडेच झुकत आहेत कि तो गरोदर नाही. यावर मोहर तेंव्हा लागते जेंव्हा अक्का कियाराच्या पोटाला हात लावतात. पण,घाबरून कियारा तिथुन निघून जाते. परंतु अक्कांना मात्र हे कळून चुकते कि, त्यांना असलेली शंका बरोबरच आहे. आता ही बातमी अक्षयला सांगितल्यावर अक्षय काय करेल ? घरच्यांना हे सत्य अक्षय कधी आणि कस सांगेल ? घाडगे कुटुंब आणि विशेषत: माई यावर काय म्हणतील ? कियारा घरात परतली आहे आता अमृताचं अस्तित्व घाडगे परिवारात काय असेल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

हे सगळ जाणून घेण्यासाठी नक्की बघा घाडगे & सून रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Kiyara Truth Ghadge and Suun 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement