News
Typography

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. कलाकारांचा अभिनय, मालिकेमध्ये घडणाऱ्या घटना, राधाचं तिच्या माणसांवर आणि प्रेमवर असलेले निस्वार्थी प्रेम, तिने घरच्यांसाठी आणि प्रेमासाठी केलेला त्याग, देवयानी – दीपिकाच्या प्रत्येक कारस्थाना ज्याप्रकारे राधा सामोरी गेली, तिच्या परिवाराला प्रत्येक संकटापासून जसे तिने वाचवले हे सगळेच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. प्रेक्षकांनी दिलेल्या या प्रेमामुळेच राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने आता तब्बल ४०० भागांचा पल्ला गाठला आहे. ४०० भागांचा पल्ला मालिकेने गाठला याचा आनंद कलाकारांनी सोशल मिडीयावर व्यक्त केला. प्रेक्षकांना येत्या भागांमध्ये देखील बऱ्याच रंजक घटना बघायला मिळणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Radha Prem Rangi Rangli 400 Episodes 01

राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये या वर्षाममध्ये बऱ्याच घटना घडल्या, राधा आणि प्रेमच लग्न, त्यांच्या प्रेमाची सुरुवात, राधाच अचानक प्रेमच्या आयुष्यामधून निघून जाणं, राधाचं प्रेमा म्हणून मालिकेमध्ये येणं, दीपिका आणि देवयानीचा राधाला प्रेमच्या आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न, राधा – प्रेम विरोधात रचलेले कारस्थान, दीपिकाने खोट्याचा आधार घेऊन प्रेमला आपलसं करण्याचा केलेला प्रयत्न. हे सगळं राधानी मोठ्या धीराने सहन केलं. प्रत्येक कठीण प्रसंगाला ती मोठ्या हिंमतीने सामोरी गेली... राधा दीपिकाच्या विरोधात ठामपणे आणि खंबीरपणे उभी राहिली. आता मात्र पुन्हा राधा आणि प्रेमच्या आयुष्यात सुखाची चाहूल लागणार आहे. राधा गरोदर असल्याची गोड बातमी तिने प्रेमला आणि घरच्यांना सांगितली असून सगळेच खूप आनंदी आहेत. या दोघांच्या सुखात पुन्हा दीपिका मिठाचा खडा तर टाकणार नाही ना ? दीपिका आता कोणती खेळी खेळणार ? त्याला राधा आणि प्रेम कसं उत्तर देणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

तेंव्हा हे सगळं जाणून घेण्यासाठी नक्की बघा राधा प्रेम रंगी रंगली सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement