News
Typography

कलर्स मराठीवरील “घाडगे & सून” ही मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता तब्बल ५०० भागांचा पल्ला गाठला आहे. याचबरोबर आता मालिकेमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच घटना बघायला मिळणार आहेत.

Ghadge and Suun 500 Episodes 02

घाडगे सदनमध्ये अक्कांच्या येण्याने माईंना बराच धीर मिळाला दुसरीकडे अमृता प्रेक्षकांना पुन्हा एकदा साडी आणि मंगळसूत्रामध्ये दिसली. अक्कांनी परत जाताना अक्षयला एक मोठं सत्य सांगितले ज्यामुळे आता लवकरच अक्षय आणि कियाराच आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे. कियारा गरोदर नसल्याचे सत्य अक्षयला कळल्यामुळे तो पूर्णतः खचून गेला आहे. आता पुढे अक्षय कुठले पाउल उचलेल ? कियाराला अक्षय या गोष्टीचा जाब विचारू शकेल का ?अक्षय कियाराचे सत्य घरच्यांना सांगू शकेल ? कियारा घरात परतली आहे आता अमृताचं अस्तित्व घाडगे परिवारात काय असेल ? हे बघणे रंजक असणार आहे. मालिकेने आता ५०० भागांचा पल्ला गाठला असून घाडगे सदन मध्ये अजून एक घटना घडणार आहे ज्यामुळे अक्षय, अमृता आणि कियाराचे आयुष्य बदलणार आहे. काय आहे हि घटना. काय घडणार आहे ? हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा तेंव्हा “घाडगे & सून” सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

सगळ्या टीमने सेटवर केक कापून, सेल्फी काहून आनंद साजरा केला.

मालिकेने ५०० भाग पूर्ण केले आहे याबद्दल सांगताना चिन्मय उदगीरकर म्हणाला, “घाडगे & सून मालिकेचे ५०० भाग पूर्ण झाले यावर खरोखरच विश्वास बसत नाहीये. असं वाटत आहे काल परवाच शूट सुरु झालं. ही मालिका करताना आम्हांला काय गवसलं तर प्रेक्षकांचं खूप प्रेम. माझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर अक्षय ही भूमिका करताना मला खूप समाधान मिळत आहे. कारण मी आजवर ज्या भूमिका साकारल्या त्या सगळ्यांपेक्षा वेगवेगळ्या छटा या भूमिकेला आहेत आणि खूप आव्हानात्मक आहे. मी जेंव्हा काही कार्यक्रमांना जातो तेंव्हा मला प्रेक्षक अकी म्हणून हाक मारतात इतकी ही भूमिका त्यांना आपलीशी वाटते आणि आवडते याचा मला आनंद आहे. मला या मालिकेच्या रुपात एक दुसर कुटुंबच मिळाल आहे असे मी म्हणेन. एक गमंतीशीर गोष्ट मला अशी वाटते कि, आमच्या सगळ्या टीम मध्ये जे बॉन्डीग पहिल्या दिवशी होतं तेच अजूनही आहे.”

Ghadge and Suun 500 Episodes 03

Ghadge and Suun 500 Episodes 04

Ghadge and Suun 500 Episodes 05

Ghadge and Suun 500 Episodes 06

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement