News
Typography

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका सध्या बरीच गाजते आहे. मृणाल दुसानिस आणि शशांक केतकर यांची जोडी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. दिवसातला बराचसा वेळ कलाकार सेट वर असतात. सेटवर कामा बरोबरच सिन्सच्या मध्ये बरीच धम्माल मस्ती देखील करतात. कधी सेल्फी काढण, गेम्स खेळण, एकत्र जेवण आणि बरच काही. यातूनच त्यांच्या मध्ये चांगली मैत्री देखील होते. सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेतील सगळ्याच कलाकारांची एकमेकांशी चांगली मैत्री झाली आहे. पण, प्रेक्षकांची लाडकी अनु म्हणजेच मृणाल दुसानिसचा अजून एक बेस्ट फ्रेंड आहे आणि तो म्हणजे तिचा फोन !

Mrunal Dusanis He Mann Baware 02

मृणालचा फोन म्हणजे आठवणीचा साचा आहे असे म्हणायला हरकत नाही. बरेचसे जुने फोटोज तिने फोनमध्ये अजूनही तसेच ठेवले आहेत. तसेच मृणालला गेम्स खेळायला देखील आवडते ती रिकाम्या वेळेमध्ये सेटवर वा घरी २ dots आणि असे बरेच गेम्स खेळते. गेम्स म्हणजे माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे असे देखील ती म्हणाली. तिच्या फोन बद्दल विचारले असता ती म्हणाली, “फोन म्हणजे माझ्यासाठी सगळं काही.” माझा नवरा परदेशामध्ये आणि घरचे सगळे नाशिकला असल्याने माझा फोन माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. तसेच गेम्स बरोबर रोजच्या घडामोडी साठी न्यूजच्या वेबसाईट आणि गाणी ऐकण्यासाठी जिओ सावन आहे. सगळ्यांच माहिती आहे मृणाल सोशल मिडीयावर फारशी दिसत नाही परंतु इंस्टावर मात्र मृणाल बरीच active असते. बऱ्याचदा काही बातम्या तिथून देखील कळतात अस देखील ती म्हणाली.

Mrunal Dusanis He Mann Baware 01

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)