News
Typography

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये एकीकडे सिद्धार्थला कुठेतरी अनुचा सहवास, तिच्यासोबत गप्पा मारणे हे आवडू लागले आहे म्हणजेच ही प्रेमाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. सिध्दार्थने अनुचा विश्वास आणि मैत्री पुन्हा मिळवली आहे. काही दिवसांपासून सिद्धार्थची तब्येत ठीक नसल्याने तो घरीच आहे. हे सगळे होत असतानाच दुर्गाची इच्छा आहे सिद्धार्थने तिला आवडणाऱ्या मुलीशी लग्न करावे. पण याबाबत सिद्धार्थला काहीही माहिती नाही. दुसरीकडे सिद्धार्थच्या आजीने अनुला तत्ववादिंच्या घरी बोलावले आहे. अनु घरी येणार म्हणून सिद्धार्थने त्याची रूम नव्याने सजवली असून सिद्धार्थ खुश आहे. परंतु हे अजूनही दुर्गाला माहिती नाही. जेंव्हा दुर्गाला हे समजते ती पोलिसांना बोलावते. आता पुढे काय होणार हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे रात्री ८ वा. फक्त कलर्स मराठीवर.

Anu Siddharth Distance He Mann Baware 01

अनु सिद्धार्थला भेटायला येते तेंव्हा खास तिने बनवलेले मोदक घेऊन येते, घरी येताच ती किचन मध्ये देखील हातभार लावते हे सगळे बघून अनु आजीचे मन जिंकते. दुर्गाने पोलिसांना बोलावले आहे हे जेंव्हा आजीला कळते तेंव्हा आजी दुर्गाला समजवण्याचा प्रयत्न करते कि, तू अस वागून तुझ्यात आणि सिद्धार्थ मध्ये दुरावा आणत आहेस. असे केलेस तर सिद्धार्थ अजून अनुच्या जवळ जाईल आणि तुझ्यापासून दूर होत जाईल. हे सगळे प्रकरण सिद्धार्थला कळेल ? अनु आणि सिद्धार्थच्या मैत्रीमध्ये दुर्गा पुन्हा दुरावा आणू शकेल ?

Anu Siddharth Distance He Mann Baware 02

अनु आणि सिद्धार्थची ही खास भेट आणि त्यामध्ये दुर्गाचा या दोघांच्या नि:स्वार्थी मैत्री मध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न यशस्वी होईल ? जाणून घेण्यसाठी नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मन बावरे रात्री ८ वा. फक्त कलर्स मराठीवर.

Anu Siddharth Distance He Mann Baware 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)