News
Typography

आनंदाचा, उत्साहाचा आणि रंगांचा सण म्हणजे होळी. या खास सणाचं धमाकेदार सेलिब्रेशन स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे. आपापसातले हेवेदावे विसरुन संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंब या सणाच्या निमित्ताने एकत्र आलंय. होळीच्या सणासोबतच धुळवड खेळत सर्वांनीच रंगांची उधळणही केलीय. शूटिंगच्या निमित्ताने सेटवर कलाकारांनी रंगोत्सव साजरा केलाय.

या मालिकेत नुकतीच गौरव घाटणेकरचीही एण्ट्री झालीय. त्यामुळे ‘ललित २०५’ कुटुंबासोबतचा त्याचा हा पहिलावहिला सण. या मालिकेत तो आदित्य ही भूमिका साकारतोय. सेटवरच्या या धमाल सेलिब्रेशन बद्दल सांगताना गौरव म्हणाला, "बऱ्याच वर्षांनंतर मी रंगोत्सव साजरा केलाय. पूर्वी शाळा-कॉलेजमध्ये असताना मी हा सण खूप एन्जॉय करायचो. ‘ललित २०५’ मालिकेतली ही धुळवड माझ्या कायम लक्षात राहिल. जवळपास १२ तास आम्ही रंगांची उधळण केली. प्रेक्षकांसाठी हा होळी स्पेशल एपिसोड खूपच खास ठरणार आहे. या भागात आदित्यचं एक खास गुपितही उलगडणार आहे. तेव्हा ‘ललित २०५’चा हा भाग पाहायला विसरु नका."

Lalit 205 Holi Celebration 02

भैरवीची भूमिका साकारणारी अमृता पवारही मालिकेतल्या या सेलिब्रेशनविषयी भरभरुन बोलली, "होळी स्पेशल भागाचं शूटिंग आम्ही जवळपास ३ दिवस केलं. होळी दहनाच्या शूटिंगदिवशी आम्ही सेटवर सुग्रास जेवणाचा बेतही केला. खास बात म्हणजे या सेलिब्रेशनमध्ये इको फ्रेण्डली रंग वापरले आहेत आणि पाण्याचा वापर कुठेही केला नाही. त्यामुळे प्रेक्षकांनाही मी इको-फ्रेण्डली रंगोत्सव साजरा करण्याचं आवाहन करेन."

तेव्हा ‘ललित २०५’ मालिकेतलं हे धमाकेदार सेलिब्रेशन पाहायला विसरु नका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Lalit 205 Holi Celebration 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement