News
Typography

मराठी छोट्या पडद्यावर अनेकवेळा वेगळ्या विषयाचे अनेक उत्तम धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचे बनलेले आपल्याला ज्ञात आहेत . झी युवा वाहिनीने सुद्धा असे अनेक वेगळे विषय हाताळलेले प्रेक्षकांच्या मनात घर केले . मुक्ता बर्वेची रुद्रम मालिका तर प्रेक्षकांच्या आजही आवडीची आहे . याचप्रमाणे झी युवा वाहिनीने 'एक घर मंतरलेलं' ही थरारक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे . मालिकेत सुरुची अडारकर ही गार्गी महाजन ह्या पत्रकाराची भूमिका निभावत आहे. आता या मालिकेत सुयश टिळक या लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री झाली आहे. सुयश आणि सुरुची या दोघांची लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे . उत्कृष्ट विषय, त्याची योग्य हाताळणी आणि गुणी कलाकार यांनी बनलेली 'एक घर मंतरलेलं' ही मालिका प्रेक्षक सोमवार ते शनिवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवावर पाहू शकतात.

Suyash Tilak Ek Ghar Mantarlela 01

सुयश मालिकेत क्षितिज निंबाळकर हे पात्र साकारत आहे. क्षितिज हा एक नामवंत व्यवसायिक असून त्याला दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा छंद आहे. त्याचबरोबर अतिशय तर्कशुद्ध विचार करणारा आणि कोणत्याही गोष्टीला न घाबरणारा असा क्षितिज कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेतो.

Suyash Tilak Ek Ghar Mantarlela 02

मालिकेची कथा 'मृत्युंजय या बंगला आणि या बंगल्याबद्दल असलेल्या अनैसर्गिक गूढ गोष्टींबद्दल असून या दोघांचे या बंगल्याशी काही ना काही कनेक्शन दाखवले आहे मृत्युंजय बंगला जिथे कोणीही विकत घ्यायला तयार नसताना केवळ अतिशय किरकोळ किमतीलामिळत असल्याने क्षितिज हा बागला विकत घेतो तर या बंगल्यातील अनैसर्गिक गोष्टींचं गूढ उकलण्याचा प्रयत्न गार्गी (सुरुची अडारकर) करत आहे. 'क्षितिज आणि गार्गी यांच्यामध्ये मृत्युंजय' बंगल्याच्या च्या निमित्ताने पुढे नक्की काय घडणार याची उत्सुकता आता निर्माण होत आहे .

क्षितिज आणि गार्गी यांचा मंतरलेल्या घरासोबतचा हा प्रवास सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता, झी युवावर पहा.

Suyash Tilak Ek Ghar Mantarlela 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement