News
Typography

आणखी एक प्रेमकहाणी 'झी युवा' घेऊन येत आहे. 'साजणा' असं या नव्या मालिकेचं नाव असून, त्याचा टीजर नुकताच प्रदर्शित झालेला आहे. मालिकेचं ट्रेलर पसंतीस पडत आहे. मालिकेविषयी सर्वांच्याच मनात खूप उत्सुकता आहे. १५ एप्रिल पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता, 'झी युवा' वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. या मालिकेतील 'रमा' या मुख्य स्त्री भूमिकेत 'पूजा बिरारी' ही नवी अभिनेत्री पाहायला मिळेल.

एका छोट्याशा गावात राहणारी, घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे पुरेसं शिक्षण घेऊ न शकलेली पण तरीही स्वाभिमानी अशी ही एक तरुणी आहे. शिक्षण घेण्याची संधी मिळाली नसली, तरीही रमा स्वभावाने बेधडक आहे. तिची स्वप्नं मोठी आहेत. ही स्वप्नं साकार करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असणारी रमा छोट्या पडद्यावर पाहायला प्रेक्षकवर्गाला नक्कीच आवडेल. 'साजणा' या मालिकेत, या जिद्दी मुलीची व एका श्रीमंत घरातील मुलाची प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.

Pooja Birari Rama Serial Saajanaa 01

प्रेमाचे विविधरंग दाखवणारी ही मालिका अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासाठी एक नवी सुरुवात आहे. प्रथमच छोट्या पडद्यावर काम करणारी पूजा या भूमिकेविषयी बोलताना म्हणते, "मालिकेतील रमा आणि खऱ्या जीवनातील पूजा या दोघी सारख्याच आहेत. सतत आनंदी राहाणं व इतरांनादेखील आनंदी ठेवणं मला खूप आवडतं. त्यामुळे ही भूमिका साकारणं फार कठीण गेलं नाही. या मालिकेतून पदार्पण करत असल्याने, मनावर दडपण मात्र आहेच. कॅमेऱ्यासमोर काम करण्याचा पहिलाच अनुभव आहे. नवीन गोष्टी अनुभवायला व शिकायला मिळत आहेत. 'साजणा'मधील भूमिकेविषयी प्रेक्षकांच्या अभिप्रायाची उत्सुकता व काहीशी भीती अशी संमिश्र भावना माझ्या मनात आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे."

१५ एप्रिलपासून, सोमवार तेशनिवार संध्याकाळी ७ वाजता 'झी युवा'वर 'साजणा' ही नवी मालिका पाहायला विसरू नका.

Pooja Birari Rama Serial Saajanaa 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement