News
Typography

आणखी एक प्रेमकहाणी 'झी युवा' घेऊन येत आहे. 'साजणा' असं या नव्या मालिकेचं नाव आहे. टीजर प्रदर्शित झाल्यापासूनच, मालिकेविषयी सर्वांच्याच मनात खूप उत्सुकता आहे. १५ एप्रिल पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता, 'झी युवा' वाहिनीवर ही मालिका पाहता येईल. मालिकेतील, 'प्रताप' या मुख्य भूमिकेत अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र ला पाहण्याची संधी मिळणार आहे.

Abhijeet Shwetchandra Pratap Serial Saajanaa 01

पंचवीस वर्षांच्या आसपास वय असलेला एक उमदा तरुण, म्हणजे 'साजणा' या मालिकेतील 'प्रताप'! प्रताप शेतीक्षेत्रातील पदवीधर आहे. आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग गावाच्या भल्यासाठी करण्याची या तरुणाची महत्वाकांक्षा आहे. म्हणूनच, पदवीधर असूनदेखील, गावात राहण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. गावच्या मातीची, घराची व गावकऱ्यांची त्याला असलेली ओढ, या मालिकेत पाहता येईल. देखणा चेहरा, सुडौल बांधा आणि गावाविषयी त्याच्या मनात असलेली आपुलकी, यांच्यामुळे तो गावकऱ्यांना सुद्धा आपलासा वाटतो. या प्रतापची प्रेमकथा सोमवारपासून 'झी युवा'वर पाहता येईल.

Abhijeet Shwetchandra Pratap Serial Saajanaa 02

ही भूमिका साकारणारा अभिजीत श्वेतचंद्र, भूमिकेविषयी बोलताना म्हणतो, "एखादी उत्तम प्रेमकहाणी असलेल्या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. या मालिकेतील प्रेमकथा, ही इतर कथांपेक्षा वेगळी व आकर्षक असल्याने, ही भूमिका स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला. मी माझ्या परीने संपूर्ण प्रयत्न केले आहेत व भूमिका प्रेक्षकांना कशी वाटते, याविषयी मला प्रचंड उत्सुकता आहे. प्रेम ही नाजूक भावना, अभिनयातून योग्य प्रकारे मांडता येणं, हे मोठं आव्हान ठरतं. प्रतापचं पात्र माझ्याशी मिळतं जुळतं असल्याने, हे आव्हान स्वीकारणं फार सोपं व आनंददायक वाटलं."

Abhijeet Shwetchandra Pratap Serial Saajanaa 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement