शालेय जीवनात दंगा-मस्ती केलेले ‘बॉईज’ कॉलेजमध्ये काय कल्ला करतात हे पाहण्यासाठी प्रेक्षकांनी ‘बॉईज २’ला प्रचंड गर्दी केली होती. प्रेक्षकांनी सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला. कलाकारांचा अभिनय, त्यांचे डायलॉग्स आणि गाण्यांमुळे ‘बॉईज २’ सिनेमा चांगलाच गाजला होता. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर सोनी मराठीवर होणार असल्यामुळे कॉलेजमधली त्यांची मज्जा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तुमचे आमचे आयुष्य सुंदर, सुरेल कोण करते?
जगण्याच्या क्षणाक्षणांत आनंद कोण भरते?
कोण लिहिते कविता आणि कोण रचते गीत?
कुणाच्या सुरांशी आपली जुळून जाते प्रीत?
कोण आणते हसू ओठी, आनंदाश्रू नेत्री?
ते सारे जे आम्हा लाभले दिग्गज आनंदयात्री!!

वीरगती या वेबफिल्म नंतर, पाॅंडीचेरी या सचिन कुंडलकर दिग्दर्शित चित्रपटाचे चित्रीकरण संपवून अभिनेता 'गौरव घाटणेकर' स्टार प्रवाह वरील सोहम प्रॉडक्शन्स च्या ललित २०५ मध्ये एन्ट्री घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

आपल्या जोडीदाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड आणि जोडीदाराला दिलेली साथ यातून देखील प्रेम व्यक्त करता येऊ शकते. सोनी मराठी वाहिनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने नात्यांची लव्हस्टोरी सेलिब्रेट करणार आहे. अशीच अपूर्वा आणि विजय यांच्या अनोख्या नात्यांची लव्हस्टोरी ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दुसऱ्या भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेतील बच्चे कंपनी आणि शेवंता व अण्णा थुकरट वाडीत सज्ज होणार आहेत. आता हे सगळे कलाकार थुकरट वाडीत आल्यानंतर विनोदवीरांनी देखील एकच कल्ला केला.

शिक्षणामुळे जोडली गेलेली ‘ती फुलराणी’ मालिकेतील मंजू आणि शौनकची जोडी एकमेकांच्या सोबतीने त्यांच्यमध्ये निर्माण झालेले नवीन नाते अनुभवत आहेत. एकीकडे त्यांच्या नव्या नात्यात तयार झालेला गोडवा, प्रेमाच्या क्षणांचा आनंद दोघेही घेत आहेत तर दुसरीकडे देशमुख कुटुंबाकडून येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी ते दोघे एकमेकांचा आधारही बनले आहेत.

Advertisement