घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित बापमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने २०० भागांचा यशस्वी टप्पा पार केला. सध्या मालिकेत प्रेक्षक आबा साहेबांच्या सत्तेसाठी चाललेली चढाओढ आणि निशावर सगळ्यांचा संशय असल्याचं पाहत आहेत. पळून जाऊन लग्न करण्यासाठी मदत मागायला आलेली मुलं अचानक गायब होतात आणि त्यांना शोधायची जबाबदारी सूर्या घेतो.

कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन होणार आहे. सध्या मालिकेमध्ये अमृता माईना झालेल्या आजारामुळे चिंतेत आहे, माईना बरं करणं हे एकमेव ध्येय आता अमृतासमोर आहे. घाडगे सदन मध्ये कोणालाच माईच्या आजाराबद्दल माहिती नाही. परंतु आता मात्र माई सगळ्यांना त्यांना कर्करोग असल्याचे सत्य तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरु आहेत हे सांगणार आहेत. हे घरातल्यांना कळल्यामुळे सगळेच खूप दु:खी झाले आहेत तसेच वसुधाला देखील खूप वाईट वाटते.

‘प्रेमा तुझा रंग कसा’ च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करणार आहेत.

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये काही महिन्यांपासून राधा आणि प्रेमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच घटना घडत होत्या. पण आता राधा तिच्या घरी सुखरूप पोहचली असून, देवयानीचा अचानक मृत्यू झाला आहे. दिपिका आता पूर्णत: एकटी पडली आहे. माधुरीला विक्रमने जे सत्य सांगितले आहे, त्यामुळे माधुरीच्या मनात बरेच प्रश्न आहेत. प्रेम आणि लल्लन हे देवयानी आणि विक्रमची जुळी मुलं आहेत हे सत्य प्रेमच्या देखील समोर येते, जे विक्रमच प्रेमला सांगतो. परंतु हे सगळे खरे नसून प्रेम आणि लल्लन विक्रमची नव्हे तर विश्वनाथ आणि देवयानीची मुलं आहेत. प्रेमला हे सत्य कधी कळेल? हे सत्य कळल्यावर काय होईल? हे बघणे रंजक असणार आहे. या सगळ्यामध्ये आता राधा आणि प्रेमच्या आयुष्यात बाप्पा नक्कीच सुखं घेऊन येईल यात शंका नाही. कारण, राधा आणि प्रेम आता गणरायाचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करणार आहेत.

स्टार प्रवाहवरील ‘ललित २०५’, ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘छोटी मालकीण’ मालिकेचा महासंगम एपिसोड. आपल्या सर्वांचं लाडकं दैवत म्हणजे गणपती बाप्पा. या लाडक्या दैवताची आपण वर्षभर आतुरतेने वाट पहात असतो. ‘ललित २०५’ या मालिकेतलं राजाध्यक्ष कुटुंबही गेले कित्येक वर्ष बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलंय. यंदा मात्र त्यांची ही प्रतीक्षा पूर्ण होणार आहे.

गणेश चतुर्थीचा सण म्हणजे बाप्पासाठी मोदक, गोड-धोड आणि चमचमीत पदार्थांची चंगळ. अकरा दिवस बाप्पाला स्वादिष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा असते आणि नवनवीन पदार्थ बनवण्यासाठी झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील सुगरण गृहिणींना मदत करत आहे. गणेश चतुर्थी निमित्त आम्ही सारे खवय्येच्या किचनमध्ये खमंग पदार्थांचा बेत असणार आहे आणि यामध्ये काही खास पाहुणे मंडळी सुद्धासामील होणार आहेत.

Advertisement