स्टार प्रवाह’च्या ‘ललित २०५’ मालिकेमध्ये लवकरच नील आणि भैरवीच्या लग्नाचा सोहळा पाहायला मिळणार आहे. नीलच्या लग्नाची जुळवाजुळव सुरु असतानाच नील अचानक भैरवीला घरी घेऊन आला. एवढंच नाही तर भैरवीशी लग्न केल्याचं सांगत त्याने संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाला धक्का दिला. आता मात्र आजीच्या इच्छेखातर नील आणि भैरवीच्या विधीवत लग्नाचा घाट घालण्यात आलाय. लग्नासाठी राजाध्यक्ष कुटुंबाने जोरदार तयारीही केलीय.

मनमुराद हसणे हे आपल्या आयुष्यात नेहमीच फायदेशीर ठरते. आजच्या या धकाधकीच्या जीवनातून काहीवेळ सर्व ताण तणाव विसरून आपल्याला काही मनोरंजनाचे क्षण देण्यासाठी आणि आपल्या चेहऱ्यावर एक निखळ हास्य उमटवण्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील विनोदी सिनेमे आणि नाटक अतिशय महत्वाची भूमिका निभावतात. त्यात काम करणारे हास्यकलाकार यांना मिळणारा मान प्रसिद्धी ही इतर आघाडीच्या अभिनेत्यांच्या तुलनेत फारच कमी असते. मराठी रंगभूमी आणि सिनेमाशी निगडित पुरस्कार सोहळ्यात सुद्धा विनोदी नाटक आणि सिनेमांना योग्य ते महत्व मिळत नाही . त्यामुळेच विनोदी शैलीला त्याचे एक व्यासपीठ देण्यासाठी आणि मराठी विनोदाला एक वेगळा दर्जा देण्यासाठी, झी टॉकिजने अतिशय अभिमानाने 'झी कॉमेडी अवॉर्ड्स' हा हास्याचा उत्सव साजरा करायला प्रारंभ केला. झी टॉकीज वर, झी कॉमेडी अवॉर्ड्स २०१८ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या वर्षी याकार्यक्रमाचे हे ५ वे वर्ष असून झी टॉकिज कॉमेडी अॅवॉर्डस अजून दिमाखदार होणार आहेत.

झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस, निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने नुकतेच ५०० भागांचा टप्पा पार केला. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेतील अनुभवलेला ट्विस्ट म्हणजे राणाला मॅटवरची कुस्ती शिकवायला आलेली नवीन लेडी मॅनेजर. आधीच राणा त्याच्या नंदिता वहिनींचा शब्द पाळण्यासाठी त्याच्या मनाविरुद्ध मॅटवरची कुस्ती खेळायला तयार झाला आहे आणि त्यात मुलींपासून चार हात लांब राहणाऱ्या राणाला मॅटवरची कुस्ती शिकवण्यासाठी एक लेडी मॅनेजर म्हणजेच सखी यांनी राणादावर अनेक निर्बंध लादले आहेत आणि राणादा वैतागून गेला आहे.

Sony मराठी ह्या नवीन वाहिनीच्या माध्यमातून Sony Pictures Networks India (SPN) मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये एक नवीन पायंडा घालू पाहत आहे. आजच्या काळाला अनुरूप असे विषय घेऊन येणारी ही नवीन वाहिनी येत्या १९ ऑगस्टला घराघरांत पोहोचणार असून मराठी भाषक श्रोत्यांसाठी सबंध कुटुंबानं एकत्रित पाहण्याजोग्या अशा कलाविष्कारांची एक पर्वणी असेल. आशयघन मालिकांच्या माध्यमातून ‘विणूया अतूट नाती’ ह्या आपल्या मूळ विचाराशी एकनिष्ठ राहत Sony मराठीचा मनोरंजनाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी अतूट नाती विणण्याचा प्रयत्न असेल.

कलर्स मराठीवरील नवरा असावा असावा तर असा हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या बराच पसंतीस उतरत आहे. आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेत आहेत. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदा ताईशी मनमोकळे पणे गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास सांगतात. परंतु रविवारच्या भागामध्ये आलेले खास सदस्य त्यांचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास कसा होता हे सांगणार असून बऱ्याच गप्पा देखील मारणार आहेत.

होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवीच्या मंगळसूत्रापाठोपाठ आता झी युवावरील 'फुलपाखरू' या मालिकेतील वैदेहीचं मंगळसूत्र सध्या चर्चेत आलं आहे. प्रेक्षकांनी नुकतंच मालिकेत मानस आणि वैदेही यांचा विवाहसोहळा पाहिला. त्या दोघांचं अगदी थाटामाटात लग्न झालं. लग्नाच्या विधीमध्ये वैदेहीने नववारी साडीवर घातलेलं हे मंगळसूत्र अतिशय लोकप्रिय ठरलं. मालिकेतील कोणती गोष्ट कधी प्रेक्षकांना भावेल हे सांगता येत नाही.

Advertisement