संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २' ने उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. या आठवड्यात संगीत सम्राट पर्व २ च्या मंचावर सज्ज होणारा पाहुणा कलाकार हा परीक्षक आदर्श शिंदे यांच्यासाठी खूप खास आहे. हा पाहुणाकलाकार दुसरा तिसरा कोणी नसून सुप्रसिद्ध लोकसंगीत गायक आनंद शिंदे म्हणजेच आदर्शचे वडील आहेत.

संगीत हा मराठी रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्या कोणत्याही सण आसवांमध्ये मनाला स्फूर्ती देण्याचं काम संगीत करतं. विविध स्थरातील, वयोगटातील लोकांना एकत्र आणण्याचं काम संगीत करतं. त्यामुळे अशाच निखळ, निरागस आणि सुरांनी भरलेला बहारदार संगीत मैफलीचा अनुभव रसिकांना देण्यासाठी कलर्स मराठीनं आणलं आहे सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर हे नवं पर्व. सेलेब्रिटी गायकांच्या गायकीने पहिलं पर्व गाजल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शोधून काढलेल्या छोट्या सूरवीरांचं हे पर्व आता रंगणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख आठ शहरांमधुन आता तब्बल सहा हजार मुलांमधून निवड झालेल्या ६ ते १५ वयोगटातील बालगायकांची मेगा ऑडिशनची फेरी १३ ऑगस्ट पासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मागील पर्वाप्रमाणेच याही पर्वात आपल्या परिक्षणाने आणि ‘दाद’ देण्याच्या शैलीने, मार्गदर्शनाने प्रेक्षकांची मने जिंकलेले अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे परीक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. तर सर्वांची लाडकी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी या नव्या कोऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

लोकप्रियतेचा शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा पार गाठला आहे.

प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर, विराजस कुलकर्णी, अक्षय टंकसाळे आणि संजय जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हॉस्टेल डेज’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर १२ ऑगस्टला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता ‘स्टार प्रवाहवर’ पाहण्याची सुवर्णसंधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’च्या सेटवर नुकतंच एक दमदार सेलिब्रेशन करण्यात आलं. निमित्त होतं ते या मालिकेचे निर्मिती प्रमुख दादा गोडकर यांच्या वाढदिवसाचं. खरतर मालिकेमुळे कलाकार घरोघरी पोहोचत असतात. पण या कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात पडद्यामागच्या मंडळींचीही तेवढीच मेहनत असते. याच मेहनतीची दखल घेत ‘छोटी मालकीण’च्या सर्व कलाकारांनी एकत्र येऊन दादा गोडकर यांचा ६९वा वाढदिवस साजरा केला.

Advertisement