‘जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे’ असं म्हणतात. प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी मार्गदर्शनाची आणि पाठींब्याची आवश्यकता भासते. विशेषत: संकटकाळी काय करावे, कोणता निर्णय घ्यावा असा प्रश्न बऱ्याचदा पडतो. कधी कधी दिशाहीन झाल्यासारखे वाटते अश्या परिस्थिती मध्ये आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो. अश्यावेळी परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन भक्ताचा तारणहार बनतो. असेच थोर संत महाराष्ट्रात होऊन गेले ज्यांनी सर्वसामान्य लोकांना भक्तिमार्ग दाखवला. ज्यांच्या शक्तीचा प्रत्यय त्यांच्या सत्कर्मातून लोकांना आला, ज्यांनी गरजू लोकांना जवळ केले, त्यांची मदत केली, भरकटलेल्यांना मार्ग दाखविले. लोकपरोपकारार्थ आणि भक्तांचे कल्याण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचलेल्या “श्री सद्गरु संत बाळूमामा” यांचे चरित्र आणि त्यांच्यातील दैवत्वाची प्रचिती लवकरच प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. कलर्स मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे साक्षात महादेवाचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या “संत बाळूमामा” यांचे जीवन चरित्र. तेंव्हा बघयाला विसरू नका बालमूर्तीच्या मंगल चरित्राचा आरंभ - “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” १३ ऑगस्टपासून सोम ते शनि संध्या. ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर. संतोष अयाचित लिखित या मालिकेची निर्मिती साजरी क्रिएटीव्हज यांनी केली आहे.

झी युवाने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली. मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि लग्न मोडल्यानंतर पराग आणि पूर्वाच्या वाटा वेगळ्या वेगळ्या झाल्या. सध्या अनुष्का आणि परागची लगीनघाई प्रेक्षक पाहत आहेत. दुसरीकडे पूर्वाला मात्र परागसाठी काहीतरी वाटतंय पण ती कोणालाच सांगू शकत नाहीये.

झी युवा ही वाहिनी आता एका रंजक पण भावनिक विषयावर आधारित 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी ६ ऑगस्टपासून सादर करणार आहे. कुटुंबात येणाऱ्या एका नव्या पाहुण्याची उत्सुकता असते आणि त्यातून येणारी आव्हाने आणि जबाबदारीतून प्रत्येक पालकांना जावे लागतेच. मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी नवीन पालकांचे प्रबोधन करण्यात 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम महत्वाची भूमिका निभावणार आहे.

स्टार प्रवाहवर ६ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘ललित २०५’ या मालिकेचा लॉन्चिंग सोहळा नुकताच संपन्न झाला. निमित्त होतं ते सुमित्रा आजीच्या ७०व्या वाढदिवसाचं. संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाने एकत्र येत लाडक्या आजीचा वाढदिवस थाटात साजरा केला. आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केलीय. या खास कार्यक्रमाला संपूर्ण बांदेकर कुटुंब हजर होतं.

विविध विषय आणि सादरीकरणातील नावीन्याने अगदी कमी वेळातच झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. कॉलेज मधील सोनेरी दिवस ते फॅमिली ड्रामा सादर करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी हि वाहिनी आता एका रंजक पण भावनिक विषयावर आधारित 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे.

आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. मालिकेत विवेक सांगळे आदित्यची भूमिका साकारत आहेत. नुकतेच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की अक्षयच्या ढोंगी स्वभाव सगळ्यांसमोर उघडकीस येतो आणि मीरा व अक्षयच लग्न तुटतं. मीरा जरी उदास असली तरी आदित्य तिला पुरेपूर आधार देतो आणि प्रेक्षक सध्या मालिकेत आदित्य आणि मीरा यांची वाढती मैत्री पाहत आहेत.

Advertisement