प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंब्यामुळे बापमाणूस मालिकेने २५० पेक्षा जास्त भागांचा यशस्वी प्रवास पार केला आणि हा प्रवास आता शेवटाला आला आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

कलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांना दर आठवड्याला मनोरंजनाची पर्वणी मिळते. प्रत्येक भागामध्ये मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारतात. या आठवड्यामध्ये सुध्दा असेच काही लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. हे कलाकार देखील कार्यक्रमामध्ये त्यांचे काही अनुभव, काही माहित नसलेले किस्से प्रेक्षकांना सांगणार आहेत. कार्यक्रमामध्ये या आठवड्यामध्ये गिरीश कुलकर्णी आणि जितेंद्र जोशी तसेच कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या नायिका सुखाच्या सरींनी हे मन बावरे मधील मृणाल दुसानिस, घाडगे & सून मधील भाग्यश्री लिमये आणि राधा प्रेम रंगी रंगली मधील वीणा जगताप हे कलाकार मकरंद अनासपुरे यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमाचा येत्या गुरु आणि शुक्रचा भाग रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

मी टू चळवळीचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असतानाच आता स्टार प्रवाहवरील ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कार्यक्रमातूनही स्त्रीयांवरील अत्याचारांना वाचा फोडण्यात येणार आहे. अन्याय सहन न करता त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे आणि अपराध्यांना धडा शिकवला पाहिजे हाच या विशेष भागांमागे उद्देश आहे. या विशेष भागांचं सूत्रसंचालन करणार आहेत दिग्गज अभिनेत्री चिन्मयी सुमीत. चिन्मयी यांनी अनेक नाटकं, मालिका आणि सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तसंच स्त्रीयांवरील अत्याचारांविरोधात त्या नेहमी आपली रोखठोक भूमिका मांडत असतात. ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या निमित्ताने याच मुद्द्यांवर त्या भाष्य करणार आहेत.

झी मराठीच्या मालिका प्रेक्षकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. सायंकाळची साडेसहाची वेळ झाली की ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापासून झी मराठी ही वाहिनी घराघरात सुरु होते आणि रात्री बाजी मालिकेपर्यंत प्रेक्षक मनोभावे हे कार्यक्रम बघतात. ‘लागिरं झालं जी’, 'तुला पाहते रे' असो की ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ आणि 'जागो मोहन प्यारे’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात तर ‘गाव गाता गजाली'ची मालवणी मंडळी प्रेक्षकांना रोज नव्या नव्या गजाल सांगून त्यांचं मनोरंजन करतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या भव्यतेने प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले आहेत.

झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अॅवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो.

दिवाळीचा सण जवळ आला की प्रेक्षकांना उत्सुकता असते ती ‘झी मराठी अवॉर्डस’च्या रंगतदार आतिषबाजीची. या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही प्रेक्षकांना आहे. यावर्षी ‘लागिरं झालं जी’, 'बाजी', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'तुला पाहते रे' आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली.

Advertisement