कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस आणि कॅप्टनसीच्या कार्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे प्रेक्षकांनी बघितलं. परंतु हे कार्य करत असताना बऱ्याच सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. सदस्यांनी त्या भावना आठवड्याच्या भागामध्ये तसेच WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर यांच्यासमोर देखील मनमोकळे पणाने व्यक्त केल्या. स्मिता गोंदकर हिने सईच्या शूजच्या लेस कापणं, आणि त्यानंतर सईने तिच्या शुजच्या लेस लपवणे असो वा कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान सई आणि जुई मध्ये झालेली बाचाबाची असो. सगळ्यांनीच आपली मते महेश मांजरेकर यांच्यासमोर मांडली. ऋतुजा, सई, जुई आणि पुष्कर यांनी त्यांच्या मनात असलेली नाराजगी व्यक्त केली.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडी जे आता एक आदर्श गाव झालं आहे त्यातील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. चित्रपटांसोबत 'चला हवा येऊ द्या'ने मराठी नाटकांना देखील प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

'सैराट'हा चित्रपट प्रदर्शित होऊन २ वर्ष उलटली तरी देखील सैराट आणि आर्ची - परशावर प्रेक्षकांचं असणार प्रेम किंचितभर देखील कमी नाही झालं. सैराटची यशोगाथा तर सगळ्यांनी पाहिली पण एक यशस्वी चित्रपट बनण्यामागे पडद्यामागच्या कलाकारांचे किती योगदान आणि कष्ट असतात, त्या चित्रपटाची कथा नरेट करण्यापासून तो प्रदर्शित होण्यापर्यंतच्याप्रवासात कॅप्टन ऑफ द शिप असलेल्या दिग्दर्शकाची मेहनत लोकांना बघायला मिळत नाही. पण झी टॉकीज वाहिनी पडद्यामागचा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन अली आहे.

गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या वेळी गुलमोहरमध्ये वडील आणि मानलेल्या मुलाचं नातं उलगडणार आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस हा खेळ रंगला होता परंतु घरामधील सदस्य हा खेळ समजून घेण्यामध्ये अयशस्वी ठरल्यामुळे बिग बॉसने त्यांना घरामधून बेघर केले. लाल चौकट असलेली जागा सदस्यांच्या हक्काची असून उर्वरित घर त्यांच्यासाठी बंद ठेवण्यात आली आणि दिवस अखेरपर्यंत घरावर सदस्यांना ताबा मिळवायचा आहे असे सांगण्यात आले... तसेच दिवसाअंती घराच्या ज्या भागावर सदस्यांचा ताबा नसेल ती जागा अनिश्चित कालावधीपर्यंत सदस्यांना वापरता येणार नाही असे देखील बिग बॉस यांनी सूचित केले.

आपल्या प्रभावी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण या मालिकेत एंट्री करत आहेत. श्रीधरच्या आत्याच्या भूमिकेत त्या दिसणार आहेत. त्यांच्या एंट्रीनं मालिकेचं कथानक कसं रंजक होतं, हे आता पहावं लागेल.

Advertisement