‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने आजवर संभाजी महाराजांच्या जीवनावरील महत्त्वाच्या घडामोडींसोबतच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकत खरा इतिहास सादर करण्याचं काम केलं आहे. यात काही नावीन्यपूर्ण वाटाव्यात अशा घटनांचा उलगडाही प्रेक्षकांना होतो आहे.

झी युवा या वाहिनीच्या सर्व मालिकांमध्ये मंदार देवस्थळी दिग्दर्शित 'फुलपाखरू' ही मालिका महाविद्यालयीन मुलांमध्ये तुफान लोकप्रिय आहे . महाविद्यालयीन आयुष्यातील पहिले प्रेम , हे कोणत्याही महाविदयालयातील तरुण तरुणीच्या अगदी मनातील जवळचा विषय असतो . त्यात मानस आणि वैदेही सारखी गोड जोडी आणि त्यांची अनोखी प्रेमकहाणी सगळ्यानांच भावली. अल्पावधीतच फुलपाखरू मालिकेतील वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळे तमाम तरूणांच्या हृदयाची धडकन झाली आहे. तर मानस म्हणजेच यशोमन आपटे सगळ्या मुलींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. नुकतेच या मालिकेने वर्षपूर्ती करून आपण किती लोकप्रिय आहोत हेच दाखवून दिले. पण या मालिकेत आता जे घडणार आहे त्यामुळे या दोघांवर मनापासून प्रेम करणाऱ्या असंख्य मुलामुलींचे हृदय तुटणार आहे. तर काही जणांचा आनंद गगनात मावणार नाही आहे. एकमेकांवर अतोनात प्रेम करणाऱ्या वैदेही मानसचं लग्न ठरलं आहे. शुभ दिनांक २९ जुलै दुपारी १२ वाजता आणि ७ वाजता छोट्या पडद्यावरील हा भव्य विवाह सोहळा झी युवावर पाहायला मिळेल. आणि २३ जुलै ते २८ जुलै रोज रात्री ९ वाजता लग्नसराई ची जंगी तयारी संपूर्ण आठवडाभर गाजेल.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सकाळपासून सदस्यांमध्ये अंतिम फेरीबद्दलची चर्चा रंगणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सकाळी सगळे खूप भाऊक झालेले दिसणार आहेत. कारण बिग बॉस यांनी लावलेले गाणे. सगळ्यांना घरामधील आजवरचे टास्क, भांडण, गप्पा सगळे आठवणार आहे. मेघाचं पहिल्या दिवसापासूनच किचनवरच प्रेम आणि तिला अनावर झालेले अश्रू. हे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे... मेघा – सई आणि पुष्कर यांना त्यांची मैत्री... सकाळचा डान्स, एकत्र टास्क करणे, स्वयंपाक बनवणे, भांडण, वाद हे सगळ या तिघांबरोबरच आस्ताद, स्मिता आणि शर्मिष्ठाला देखील आठवणार आहे. सहा जणांनी घरामध्ये आलेल्या अनेक अडचणीना मात करून आता Grand Finale मध्ये पोहचले आहेत. आजचा भाग बघणे रंजक असणार आहे तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठीमध्ये सोम ते शनि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

कलर्स मराठी वरील “सूर नवा ध्यास नवा – छोटे सुरवीर” या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे, औरंगाबाद आणि नाशिक मध्ये ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दिला. मुलांचा उत्साह आणि त्यांची तयारी वाखाणण्याजोगी होती. सगळीच मुलं प्रचंड तयारीने आली होती हे त्यांच्या गाण्यावरूनच कळत होते. कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये खूप मुलांनी सहभाग घेतला.

अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयानं स्वत:ची ओळख निर्माण केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाहच्या ललित २०५ या नव्या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा पहिला सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि उदंड प्रतिसाद मिळाला. आता हा कार्यक्रमाचे पर्व शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचलं आहे. पहिल्या पर्वामध्ये सहा सदस्य पोहचले असल्याचे बिग बॉस यांनी काल घोषित केले. त्यामुळे घरामध्ये सगळेच खूप खुश झाले. सई, पुष्कर, आस्ताद, स्मिता, शर्मिष्ठा आणि मेघा अंतिम सोहळ्यामध्ये पोहचले आहेत. आता सगळ्यांचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागून राहिले आहे कि पहिल्या पर्वाचा पहिला विजेता कोण ठरेल.

Advertisement