विनोद, आजच्या काळाचा एक परवलीचा शब्द. हा विनोद आपल्याला अनेक पातळय़ांवर भेटत असतो. झी मराठी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या दर्जेदार कार्यक्रमामधून सकस विनोद जगभरातील मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आज अनेक वर्ष या कार्यक्रमाचा ताजेपणा कायम आहे. या कार्यक्रमात सादर होणारी विविध विनोदी स्कीट्स व त्यात सहभागी होणा-या निलेश साबळे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे या कलारांनी या कार्यक्रमाचा दर्जा कायम ठेवलेला दिसतो. त्यासाठी हे विनोदवीर करत असलेली मेहनतही त्यात दिसून येते.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल देखील रंगला “मिशने ए कुशन” हा टास्क या टास्क मध्ये सई विजयी ठरली. बिग बॉस यांनी दिलेल्या शेवटच्या ऑर्डर मध्ये सईच्या टीमने बाजी मारली. नंदकिशोर यांना रेशमने सईच्या टीमच्या सगळ्या ऊशा चांगल्या आहेत हे सांगणे पटले नाही आणि ते त्यांनी रेशमला काल बोलून देखील दाखवले. काल पुष्कर, मेघा, शर्मिष्ठा, सई यांचे नंदकिशोर बरोबर चांगलेच भांडण झाले, ज्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वातावरण काही वेळासाठी जरा तापलेलेच होते. परंतु, नंदकिशोर यांना त्या भांडणावरून इतके नक्कीच कळून चुकले कि, पुष्कर, सई, मेघा, आऊ आणि शर्मिष्ठा हे पाच जण एकमेकांना धरून आहेत आणि त्यांच्यामध्ये आता चांगली मैत्री आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सई आणि त्यागराज मध्ये रंगणार आहे कॅप्टनसीचा टास्क. कोण बाजी मारणार ? कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठीमध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याचा त्याचा चाहता वर्ग आहे. कोणी सदस्यांनी तो चाहता वर्ग या कार्यक्रमामधून कमावला आहे. प्रेक्षकांनी देखील त्यांचे आवडते, लाडके स्पर्धक एव्हाना निवडले आहेत. सदस्यांची वागणूक, ते कशाप्रकारे टास्क करतात, ते घरातील इतर सदस्यांशी कसे वागतात, त्यांचे इतर सदस्यांसोबत नाते संबंध कसे आहेत अशा बऱ्याच गोष्टींचा विचार प्रेक्षकवर्ग रोज करत असतो. बिग बॉस मराठीच्या घरातील कॅमेरा तर आहेतच पण हे सदस्य प्रेक्षकांच्या देखील नजरकैदेत असतात असे म्हणायला हरकत नाही.

मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा स्टार प्रवाहवर १० जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. हा मराठी मनोरंजनाचा तडका नक्की अनुभवावा असाच आहे.

कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सुरु असलेल्या राधा नक्की जिंवत आहे कि देवयानीने खरोखरच तिला मारून टाकले आहे ? यावरून प्रेक्षकांना चांगलेच गुंतवून ठेवले होते. शेवटी सत्य प्रेक्षकांसमोर आले. जेंव्हा प्रेमा म्हणून मालिकेमध्ये आलेल्या मुलीने राधाच्या वडीलांना म्हणजेच माधव निंबाळकर यांना फोन केला. राधाने त्यावेळेस सगळे गैरसमज दूर केले तसेच गोड बातमीचा खुलासा देखील केला कि प्रेम देशमुख बाबा होणार आहे. राधाने माधव निंबाळकर यांना ती कधीच बंगलोर येथील विपश्यना सेंटरला गेली नसल्याचे सांगितले तसेच ती कुठल्याही कश्यपला देखील ओळखत नाही असे सांगितल्यावर माधव यांना खूप मोठा धक्का बसला. सगळ्यात मोठा धक्का तेंव्हा बसला तेंव्हा राधाने माधव यांच्याकडून वचन घेतले कि, हे सगळे तिच्याबाबतीत झालेले गैरसमज तसेच राहू द्या.

झी मराठीवरी लोकप्रिय मालिका 'लागीर झालं जी' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अज्या आणि शीतली सोबत मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं आहे. नुकतंच मालिकेत शीतल आणि अजिंक्यचा शुभविवाह सामूहिक विवाहसोहळ्यात पार पडला. अनेक अडचणींवर मात करून शीतल आणि अजिंक्य एकत्र आले. पण त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांचा संसार खरंच सुखाचा होऊ देतील का? हा प्रश्न सर्वांचा मनात डोकावतो.

Advertisement