आपण देवावर किती प्रेम करतो या पेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा बागुलबुवा न करता काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी देवाला सुद्धा मनुष्यरूपात मानवाला त्याचा एक मित्र म्हणून भेटण्याची गरज निर्माण होत आहे, हे दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झी युवा वाहिनीने देवाशप्पथ या मालिकेतून केला आहे. क्रिश म्हणजे कृष्ण हा देव त्याच्या श्लोक या भक्ताला भेटायला पृथ्वी तलावर आला आहे. पण हा श्लोक मात्र देवाला मानतच नाही.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार कॅप्टनसीचा टास्क. प्रत्येक सदस्याला घरातील सदस्यच देणार एक टास्क जो त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायचा आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये घरामधील सदस्यांना टास्क देण्यात येतात जे त्यांनी पूर्ण करायचे असतात त्याचप्रकारे हा देखील टास्क घरातील रहिवाश्यांना पूर्ण करायचा आहे. कॅप्टनसीसाठी प्रत्येक सदस्य खूप मेहनत घेऊन बिग बॉसने दिलेले कार्य पूर्ण करतात. कधी यावरून घरामध्ये भांडण झाल्याचे देखील प्रेक्षकांनी बघितले आहे.

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. याकार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते. मागील आठवड्यात सुपरस्टार अंकुश चौधरीने डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर चार चांद लावले. या आठवड्यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर सज्ज होणार आहेत. हे दोघांच्या उपस्थितीत स्पर्धक त्यांच्या बालपणाला उजाळा देणार आहेत.

'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील 'लागीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे ही मालिका हे यश आणि टीआरपीचे उच्चांक गाठू शकली. शीतली आणि अाज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावात आहे तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे.

एका सामान्य घरातून आलेली मुलगी जी निसर्गाने सजवलेल्या गावात वाढली, हिरव्यागार रानात रमली, नदी काठावर खेळली, शुभ पावलांनी गावात आली आणि सगळ्यांची लाडकी बनली. पण, जिचा हात तिच्या आईने ती लहान असताना सोडला आणि देवाघरी गेली, अशी लक्ष्मी त्याक्षणीच पोरकी झाली. आईच्या नसण्यामुळे लक्ष्मीचं संपूर्ण भावविश्वच बदलून गेलं. परंतु, या परिस्थितीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती तिची आजी. लक्ष्मीची आजी तिला लहानपणापासून सांगत असे कि, तुझ्या स्वप्नातला राजकुमार नक्की येईल, आणि तुझं आयुष्य प्रेमाने बहरुन टाकेल. तेंव्हापासून लक्ष्मी त्या राजकुमाराची स्वप्न पाहते आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील रंगणार “खेळ मांडला” हे कार्य. घरातील सदस्यांची दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली. काल या टास्कची सुरुवात झाली ज्यामध्ये एक टीम लहान मुलांचे पात्र साकारत होते तर दुसरी टीम खेळण्यांचे पात्र रंगवत होते. बिग बॉस मराठीच्या घरात झालेल्या लहान मुलांना त्यांच्या खेळण्यांसोबत सतत खेळून सतवायचे होते. ज्यामध्ये मेघा आणि रेशममध्ये पुन्हा एकदा वाद रंगला.

Advertisement