आपण देवावर किती प्रेम करतो या पेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा बागुलबुवा न करता काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी देवाला सुद्धा मनुष्यरूपात मानवाला त्याचा एक मित्र म्हणून भेटण्याची गरज निर्माण होत आहे, हे दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झी युवा वाहिनीने देवाशप्पथ या मालिकेतून केला आहे. क्रिश म्हणजे कृष्ण हा देव त्याच्या श्लोक या भक्ताला भेटायला पृथ्वीतलावर आला आहे. पण हा श्लोक मात्र देवाला मानतच नाही आणि त्या दोघांची जुगलबंदी प्रेक्षक मालिकेत अनुभवतात.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “व्यक्त व्हा मुक्त व्हा” हे कार्य. घरातील सदस्यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी प्रचंड राग खदखदतो आहे असे बिग बॉस यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आले आहे. त्यामुळेच या कार्यानुसार बिग बॉस मराठीच्या घरामधील सदस्यांना बिग बॉस त्यांच्या मनातील राग व्यक्त करण्याची संधी देणार आहेत. गार्डन एरियामध्ये पंचिंग बॅग आणि बॉक्सिंग ग्लोव्हस तसेच सर्व सदस्यांचे फोटोज ठेवण्यात येणार आहेत. त्या पंचिंग बॅगवर सदस्यांचे फोटोज लावून आपल्या मनातील राग बाहेर काढायचा आहे आणि कटू भावनांना मोकळी वाट द्यायची आहे. परंतु हा राग फक्त त्या बॅगला मारून नव्हे तर मनात साठलेल्या भावना आणि राग बोलून देखील दाखवायचा आहे.

कलर्स मराठीवरील घाडगे & सून मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बऱ्याच घटना घडल्या आहेत. अक्षयला घरातून काढणे, अक्षय आणि कियाराचे एकत्र राहाणे, अमृताचे घाडगे सदन मध्ये परतणे, आणि वसुधाचे कटकारस्थान. पण, आता प्रेक्षकांना काही वेगळे मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे. कारण, घाडगे सदनमध्ये महाराष्ट्राचे दोन लाडके कलाकार म्हणजेच सचिन पिळगावकर आणि स्वप्नील जोशी येणार आहेत.

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते. मागील आठवड्यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य या खास पाहुण्यांच्या उपस्थितीत स्पर्धकांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तर या आठवड्यात महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर सज्ज होणार आहे. तसेच सोनाली कुलकर्णी या मंचावर काही मनोरंजक गोष्टींचा खुलासा करणार आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधून अनिल थत्ते बाहेर पडल्यानंतर घरातील काही सदस्यांना त्यांची आठवण येत आहे, असे दिसून आले. काल रेशम, जुई, सुशांत, आस्ताद, स्मिता आणि बाकीच्या सदस्यांना बिग बॉस यांनी सरप्राईझ दिले. राजेश घरी परतला. रेशम राजेशला घरी परतल्याचे बघून खूपच खुश झाली. राजेशने त्याचा सहा दिवसांचा अनुभव घरातील सदस्यांसोबत शेअर केला. तसेच राजेश सिक्रेट रूम मध्ये असताना घरातील सदस्य कोणाबद्दल काय बोलत आहेत ? हे सगळं ऐकू आणि बघू शकत होता. त्याने ते रेशम आणि स्मिता बरोबर शेअर केले.

ग्रहण या नवीन रहस्यमय मालिकेने प्रेक्षकांना त्यांच्या टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवले आहे. बऱ्याच काळानंतर पल्लवी जोशीचे छोट्या पडद्यावर झालेलं पुनरागमन आणि गूढ मालिकेतील तिचा कमालीचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. ग्रहण ही मालिका फक्त १०० भागांचीच आहे. त्यामुळे सर्वसाधारण मालिकांमध्ये येणारा फापटपसारा येथे येत नाही आणि प्रेक्षक आतुरतेने पुढील भागाची वाट पाहतात. कथेतील गूढता आणि रहस्य तसेच ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीन्सला खिळवून ठेवण्यात मालिका यशस्वी झाली आहे. प्रेक्षकांच्या अखंड प्रेम आणि पाठिंब्यामुळे ग्रहण या मालिकेने नुकतेच यशश्वी अर्धशतक गाठले. ५० व्या भागात मात्र प्रेक्षकांना मालिकेत एक खूप मोठे ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

Advertisement