स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘नकळत सारे घडले’ या मालिकांच्या महाएपिसोडमुळे रविवार महारविवार साजरा होणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये मदर्स डे साजरा केला जाणार असल्याने हे दोन्ही महाएपिसोड खास असतील.

गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या मालिकेने आता पर्यंत त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यावेळी गुलमोहर एका आईची व्यथा आगामी 'आई' या कथेद्वारे सज्ज झाली आहे.

आपण देवावर किती प्रेम करतो या पेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा बागुलबुवा न करता काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी देवाला सुद्धा मनुष्यरूपात मानवाला त्याचा एक मित्र म्हणून भेटण्याची गरज निर्माण होत आहे, हे दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झी युवा वाहिनीने देवाशप्पथ या मालिकेतून केला आहे. क्रिश म्हणजे कृष्ण हा देव त्याच्या श्लोक या भक्ताला भेटायला पृथ्वी तलावर आला आहे. पण हा श्लोक मात्र देवाला मानतच नाही.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार कॅप्टनसीचा टास्क. प्रत्येक सदस्याला घरातील सदस्यच देणार एक टास्क जो त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये पूर्ण करायचा आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये घरामधील सदस्यांना टास्क देण्यात येतात जे त्यांनी पूर्ण करायचे असतात त्याचप्रकारे हा देखील टास्क घरातील रहिवाश्यांना पूर्ण करायचा आहे. कॅप्टनसीसाठी प्रत्येक सदस्य खूप मेहनत घेऊन बिग बॉसने दिलेले कार्य पूर्ण करतात. कधी यावरून घरामध्ये भांडण झाल्याचे देखील प्रेक्षकांनी बघितले आहे.

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. याकार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते. मागील आठवड्यात सुपरस्टार अंकुश चौधरीने डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर चार चांद लावले. या आठवड्यात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी आणि कोरिओग्राफर गणेश आचार्य डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर सज्ज होणार आहेत. हे दोघांच्या उपस्थितीत स्पर्धक त्यांच्या बालपणाला उजाळा देणार आहेत.

'लाखात एक माझा फौजी' असं म्हणत प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या झी मराठी वाहिनीवरील 'लागीरं झालं जी' या लोकप्रिय मालिकेने नुकताच ३०० भागांचा टप्पा गाठला. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे ही मालिका हे यश आणि टीआरपीचे उच्चांक गाठू शकली. शीतली आणि अाज्याची प्रेमकथा प्रेक्षकांनाही भावात आहे तशीच ती आपलीशी देखील वाटत आहे.

Advertisement