झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

दिवाळीचा सण सरला आणि तुळशीचं लग्न लागलं, की सुरूवात होते लगीन सराईला. लग्न... एक असा सण, ज्यात दोन जीवांचं होतं मिलन. जितकी तयारी एखाद्या सणाची व्हावी त्याच्या दुपटीने, लग्नाची तयारी केली जाते. हीच लगीनघाई सध्या पाहायला मिळते आहे सोनी मराठीवर सुरू असलेल्या सारे तुझ्याचसाठी या मालिकेत... निमित्त आहे श्रुती-कार्तिकच्या लग्नाचं.

भारताच्या इतिहासात ज्यांनी सुवर्णकाळ निर्माण केला ते शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज.. त्यांचं कार्यकर्तृत्व बघताना इतिहास रोमांचित झाला आणि त्यांच्या देहावसानाने हाच इतिहास गहिवरला, काळाचा कठोर स्वरही त्याक्षणी कातर झाला. म्हणूनच आजवर छत्रपती शिवाजी महाराजांवर निर्माण झालेल्या कोणत्याही नाटकात, मालिकेत, चित्रपटात शिवाजी महाराजांच्या निर्वाणाचा प्रसंग दाखवण्यात आलेला नाही.

कलर्स मराठीवरील मालिका आणि कार्यक्रम यांनी प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. मालिकेची कथा, मालिकेतील कलाकार प्रेक्षकांची लोकप्रियता मिळवत आहेत. आता कलर्स मराठीवर प्रेक्षकांना विविध विषयांवरील, वेगळ्या विषयांवर – संकल्पनेवर आधारित असलेले चित्रपट बघण्याची संधी मिळणार आहे. येत्या रविवारी वायकॉम18 मोशन पिक्चर्सचा “सायकल” हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘स्टार प्रवाह’वरील ‘ललित २०५’ या मालिकेत नाट्यमय वळण येऊ घातलंय. नील आणि भैरवीमधलं नातं खुलत असतानाच आता मालिकेत ऋषभ या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. या नव्या पात्राचा नेमका उद्देश काय आहे हे लवकरच उलगडेल, पण ऋषभच्या येण्याने नील आणि भैरवीच्या नात्यात नवं वादळ येणार हे मात्र नक्की. नील-भैरवीचं तीन महिन्यांचं लग्नाचं कॉण्ट्रॅक्टही आता संपत आलंय. पण मनाने मात्र हे दोघंही जवळ येत आहेत. नीलच्या कठीण काळात भैरवी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली ही गोष्ट नीलच्या मनात खोलवर रुजलीय. याचमुळे भैरवीबद्दल त्याच्या मनात प्रचंड आपुलकी आणि प्रेम निर्माण होत आहे. हे प्रेम व्यक्त करण्याचा नील प्रयत्न करत असतानाच आता ऋषभच्या येण्याने सर्व गोष्टी बदलणार आहेत.

प्रेक्षकांचा रविवार आणखी स्पेशल करण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. रविवार १८ नोव्हेंबरला दुपारी १२ ते ३ आणि रात्री ७ ते १० या वेळेत विठुमाऊली, छत्रीवाली आणि छोटी मालकीण या मालिकांचे महाएपिसोड्स पाहायला मिळतील.

Advertisement