कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये प्रेमला एक कटू सत्य कळलं ज्यामधून बाहेर पडण्यासाठी राधाने प्रेमला मदत केली. माधुरीने राधाला तिला खूप भीती वाटत आहे कारण जेंव्हा प्रेमला ही गोष्ट कळेल कि, तो आमचा मुलगा नसून आम्ही त्याला दत्तक घेतले आहे तेंव्हा तो माझा आई म्हणून कधीच स्वीकार करणार नाही. राधा याबतीत पुढाकार घेऊन माधुरीला मदत करण्याचा निर्णय घेते. यामुळेच राधा प्रेमला सत्य सांगते जे ऐकून प्रेम पूर्णपणे खचून जातो. इतकं मोठं सत्य का माझ्यापासून लपवून ठेवले हे त्याला कळत नाही आणि तो घराबाहेर निघून जातो. हे सगळं राधाने खूप समंजसपणे हाताळलं, प्रेमला सांभाळून घेतलं. हे सगळं घडत असताना राधा प्रेमचा व्यवसाय देखील सांभाळण्यात त्याची मदत करते आहे. हे सगळं बघून प्रेमला आता कुठेतरी राधाबद्दल प्रेम वाटू लागले आहे, आणि याचीच कबुली त्याने राधाला दिली. इतके दिवस मनामध्ये काय होत आहे हे जरी तेंव्हा कळाले नसले तरी तरीदेखील आता ते काय आहे हे प्रेमला उमगले असून त्याचे राधावरवर मनापासून प्रेम असल्याचे त्याने राधाला सांगितले आहे.

टीव्ही मालिकेमुळे केवळ मनोरंजनच होत नाही, तर चाहत्यांची स्वप्नही पूर्ण होऊ शकतात. नंदूरबारच्या प्रीती नांद्रे या चाहतीनं याचा प्रत्यक्ष अनुभवच घेतला. स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या मालिकेनं प्रीती यांना मानाचा सोन्याचा हार मिळवून दिला, सोबतच रेवती आणि श्रीधर या जोडीला भेटण्याची संधीही मिळाली.

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधून दर आठवड्याला घरामधील सदस्यांपैकी कोणीतरी एक जण घराबाहेर जाते. परंतु, काल प्रेक्षक तसेच घरातील सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला, जेंव्हा महेश मांजरेकर यांनी घरातून कोण बाहेर जाणार याचा निकाल सोमवारी लागणार अशी घोषणा केली. सध्या नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी रेशम आणि राजेश डेंजर झोन मध्ये आहेत. तेंव्हा हे बघणे रंजक असणार आहे कि, या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल ? तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस आणि कॅप्टनसीच्या कार्यासाठी स्पर्धकांमध्ये चांगलीच चुरस रंगल्याचे प्रेक्षकांनी बघितलं. परंतु हे कार्य करत असताना बऱ्याच सदस्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. सदस्यांनी त्या भावना आठवड्याच्या भागामध्ये तसेच WEEKEND चा डाव मध्ये महेश मांजरेकर यांच्यासमोर देखील मनमोकळे पणाने व्यक्त केल्या. स्मिता गोंदकर हिने सईच्या शूजच्या लेस कापणं, आणि त्यानंतर सईने तिच्या शुजच्या लेस लपवणे असो वा कॅप्टनसीच्या टास्क दरम्यान सई आणि जुई मध्ये झालेली बाचाबाची असो. सगळ्यांनीच आपली मते महेश मांजरेकर यांच्यासमोर मांडली. ऋतुजा, सई, जुई आणि पुष्कर यांनी त्यांच्या मनात असलेली नाराजगी व्यक्त केली.

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर थुकरटवाडी जे आता एक आदर्श गाव झालं आहे त्यातील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही. आजवर या मंचावर 'माहेरची साडी' पासून ते 'नटसम्राट', सैराटपर्यंत आणि हिंदीतील तिरंगा, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पासून आजच्या 'दंगल'पर्यंत अनेक चित्रपटांची थुकरटवाडीकरांची खास आवृत्ती बघायला मिळाली आहे. चित्रपटांसोबत 'चला हवा येऊ द्या'ने मराठी नाटकांना देखील प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

'सैराट'हा चित्रपट प्रदर्शित होऊन २ वर्ष उलटली तरी देखील सैराट आणि आर्ची - परशावर प्रेक्षकांचं असणार प्रेम किंचितभर देखील कमी नाही झालं. सैराटची यशोगाथा तर सगळ्यांनी पाहिली पण एक यशस्वी चित्रपट बनण्यामागे पडद्यामागच्या कलाकारांचे किती योगदान आणि कष्ट असतात, त्या चित्रपटाची कथा नरेट करण्यापासून तो प्रदर्शित होण्यापर्यंतच्याप्रवासात कॅप्टन ऑफ द शिप असलेल्या दिग्दर्शकाची मेहनत लोकांना बघायला मिळत नाही. पण झी टॉकीज वाहिनी पडद्यामागचा सैराट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन अली आहे.

Advertisement