गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या वेळी गुलमोहरमध्ये वडील आणि मानलेल्या मुलाचं नातं उलगडणार आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये चोर पोलीस हा खेळ रंगला होता परंतु घरामधील सदस्य हा खेळ समजून घेण्यामध्ये अयशस्वी ठरल्यामुळे बिग बॉसने त्यांना घरामधून बेघर केले. लाल चौकट असलेली जागा सदस्यांच्या हक्काची असून उर्वरित घर त्यांच्यासाठी बंद ठेवण्यात आली आणि दिवस अखेरपर्यंत घरावर सदस्यांना ताबा मिळवायचा आहे असे सांगण्यात आले... तसेच दिवसाअंती घराच्या ज्या भागावर सदस्यांचा ताबा नसेल ती जागा अनिश्चित कालावधीपर्यंत सदस्यांना वापरता येणार नाही असे देखील बिग बॉस यांनी सूचित केले.

आपल्या प्रभावी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे स्टार प्रवाहच्या छोटी मालकीण या मालिकेत एंट्री करत आहेत. श्रीधरच्या आत्याच्या भूमिकेत त्या दिसणार आहेत. त्यांच्या एंट्रीनं मालिकेचं कथानक कसं रंजक होतं, हे आता पहावं लागेल.

Zee Yuva's Baapmanus is a story of a larger than life god fatherly figure, portrayed by senior actor Ravindra Mankani (Dadasaheb). The show revolves around the politics that goes on behind Dadasaheb and the fight in the family to take over the supreme position of the village. His son is played by Suyash Tilak, who feels it’s his responsibility to continue the great work of his father. Through his journey as the village head Dadasaheb who had a lot of detractors had one confidante in his right hand Shabbir. Shabbir stood by him through thick and thin like a pillar of strength.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल चोर पोलीस हा खेळ रंगला. लहानपणी आपण वेगवेगळे खेळ खेळले पण हा उत्कंठावर्धक खेळ आपण गंमत म्हणून खेळला असला तरी आता या घरामध्ये मात्र या खेळामुळे अनेक निर्णय घेण्यात येणार आहेत याची पूर्वकल्पना बिग बॉसने स्पर्धकांना दिली होती. या खेळा दरम्यान झालेल्या काही गोष्टींमुळे मेघा आणि स्मिता मध्ये भांडण होणार आहे. ज्याचे कारण प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये कळेलच.

दमदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्सेस सादर करून झी युवावरील डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. कार्यक्रमातील तुफान स्पर्धकांमुळे ही स्पर्धा दिवसेंदिवस जास्तच अवघड होत चालली आहे. या कार्यक्रमात नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन पाहायला आणि अनुभवायला मिळते. मागील आठवड्यात महाराष्ट्राला याड लावणाऱ्या सुपरहिट चित्रपट 'सैराट'च्या टीमने या मंचावर धमाल केली तर या आठवड्यात महाराष्ट्र दिवस साजरा करण्यासाठी स्टाईल आयकॉन आणि महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीने या मंचावर चार चांद लावले.

Advertisement