बहीण-भावाचं नातं आणखी दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या खास सणाचं सेलिब्रेशन स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेच्या महाएपिसोडमध्ये होणार आहे. या खास भागात एक बहीण पाहातेय रक्षाबंधनाचं स्वप्न.

संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २' ने उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेम आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणत आहेत. या आठवड्यात संगीत सम्राटच्या मंचावर पहिल्या पर्वाची परीक्षक क्रांती रेडकर आणि संगीतकार अमितराज सज्ज होणार आहेत.

आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणिस्वच्छंदी आहे. सध्या मालिकेत प्रेक्षक मीरा आणि आदित्यमधील वाढती मैत्री व त्या मैत्रीचं प्रेमात झालेलं रूपांतर पाहत आहेत.

येत्या रविवारी रक्षाबंधन असल्याने सगळ्याच बहिणी खूप आनंदी आहेत. प्रत्येक बहिणीसाठी हा खूप महत्वाचा दिवस असं म्हणायला हरकत नाही. या दिवसानिमित्त कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे तसेच घाडगे & सून मालिकेतील अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमये, राधा प्रेम रंगी रंगली मालिकेतील राधा देशमुख - वीणा जगताप, प्रेम देशमुख – सचित पाटील यांनी त्यांचे काही अनुभव सांगितले.

‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास 2 वर्षभरापूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. सबंध महाराष्ट्रातील तमाम जनतेने डोक्यावर उचलून धरलेल्या या लोकप्रिय मालिकेने नुकतंच २ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला.

संगीताशी आपल्या सगळ्यांचं अतूट नातं आहे. “सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर” या पर्वामध्ये उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे परंतु मंचावर असणार आहेत लहान बाळगोपाळ. ६ ते १५ वयोगटातील बच्चेकंपनी या कार्यक्रमामध्ये आपल्या सुरांची जादू प्रेक्षकांसमोर तसेच परीक्षकांसमोर सादर करत आहेत. लहान मुलं म्हणजे थोडी मस्ती आणि थोडा कल्ला होणारच. पण याचबरोबर हे छोटे सूरवीर सुरांशी दोस्ती करून मंचावर मैफल रंगवत आहेत हे नक्की. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन या मुलांची निवड करण्यात आली आहे. आता या सगळ्या स्पर्धकांमधून फक्त २१ जणांची निवड करण्यात आली आहे. हे छोटे सूरवीर मंचावर सुरांची जादू पसरविण्यासाठी सज्ज झाले आहेत. एका पेक्षा एक सुंदर आवाज या मंचावर प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहेत. गाला राउंडची रॉकिंग सुरुवात झाली आहे. निरागस आणि लोभस स्वरांनी “सूर नवा” कार्यक्रमाचा मंच बहरून जाणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा - छोटे सूरवीर सोम ते बुध रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Advertisement