कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये WEEKEND चा डाव मध्ये आरती सोलंकी कमी मतं मिळाल्याने घरा बाहेर केली. यामुळे मेघा धाडेने अनिल थत्ते यांना खडे बोल सुनावले. तर दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांची माफी देखील मागितली. प्रत्येक आठवड्यामध्ये या घरामधून एक सदस्य घरा बाहेर जाणार हे निश्चित असल्याने या आठवड्याची सुरुवात देखील नॉमिनेशन प्रक्रियेने होणार आहे. या प्रक्रीयेमध्ये कोण कोण कोणाला नॉमीनेट करणार ? कोणाला घराबाहेर जावे लागणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या बापमाणूस या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतल्या आणि गावाचा बापमाणूस असलेल्या भल्या माणसाच्या या गोष्टीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठीचाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. सध्या मालिकेत गीता आणि सूर्या यांच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव दोघानांही होत आहे, पण गीताची सूर्याच्या घरात घुसमट होत असल्याचं सूर्याला जाणवतंय.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी हा कार्यक्रम सुरु झाल्यापासून बराच चर्चेत आहे. बिग बॉस या कार्यक्रमाने मराठी आधी हिंदी, तेलगु, कन्नड अश्या बऱ्याच भाषांमध्ये आला असून या कार्यक्रमाने बऱ्याच देशांमध्ये यशस्वी पर्व सादर करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. कलर्स मराठी वाहिनीने पहिल्यांदाच बिग बॉस सारख्या रिअॅलिटी शोचं मराठमोळं रुपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले. १५ एप्रिलपासून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवसापासून कार्यक्रमास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आणि प्रेम मिळत आहे. कार्यक्रमाच्या फॉर्मेटनुसार कोणी एक सदस्य दर आठवड्याला घरामधून बाहेर जाणार हे निश्चित आणि या बद्दलची धाकधूक प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये दर आठवड्याला असते. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये होता. म्हणूनच या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचविण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मतं दिली, पण ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला या घरामधून बाहेर पडणे अनिवार्य होते. पहिल्या आठवड्यामध्ये भूषण कडू, अनिल थत्ते आणि आरती सोलंकी डेंजर झोनमध्ये गेले आणि कमी मत मिळाली या कारणामुळे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधील, पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीयेमध्ये कमी मतं मिळाल्याने आरती सोलंकी हीला घराबाहेर जावे लागले.

उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार? हि बऱ्याच दिवसांपासून लागलेली उत्कंठा आता संपली आहे. कारण, नाट्यरसिकांकडून अनेक तर्कवितर्क केल्या जाणाऱ्या या भूमिकेसाठी, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचे नाव आता निश्चित झाले आहे. विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या या नाटकाच्या २७५ व्या प्रयोगानंतर उमेश-स्पृहाद्वारे करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्हमधून स्वानंदीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात या नाटकामधून स्पृहाऐवजी स्वानंदी उमेशबरोबर रंगभूमी शेअर करताना दिसून येणार आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये पहिल्या Weekend चा डावमध्ये कोणी एक सदस्य घरामधून बाहेर जाणार आहे, या बद्दलची धाकधूक प्रत्येक सदस्याच्या मनामध्ये आहे. या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचविण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मत दिली असणार हे नक्की. बिग बॉस मराठीच्या घरामधून दर आठवड्याला कोणतरी एक सदस्य घरा बाहेर हे निश्चित. या घरामध्ये टिकायचं असेल तर संयम आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती अत्यंत महत्वाची असते. या पहिल्या आठवड्यामध्ये महेश मांजरेकरांनी पहिले ६-७ दिवस स्पर्धकांचे कसे गेले ? स्पर्धकांची एकमेकांबद्दलची मते ? त्यांना खटकत असलेल्या गोष्टी, घरामध्ये होणारी भांडण, तसेच घरामध्ये पडणारे ग्रुप ? कोण कुठे चुकले ? अश्या अनेक विषयांवर मनमोकळे पणाने चर्चा केली. स्पर्धकांच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याची आणि त्यांना आपली मते प्रेक्षकांसमोर तसेच घरच्यांसमोर मांडण्याची संधी दिली. या पहिल्या Weekend चा डावमध्ये रविवारी स्पर्धकांच्या राशींबद्दल माहिती सांगण्यासाठी येणार आहेत ज्योतीश्याचार्य आणि राशीचक्र या कार्यक्रमाचे विक्रमी ३००० प्रयोग केलेले श्री. शरद उपाध्ये. तेंव्हा बघायला विसरू नका “बिग बॉस मराठी - Weekend चा डाव रविवारी रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Zee Yuva’s popular show ‘Gulmohar’ which narrates some of the most uncommon and well written love stories, is all set to celebrate the spirit of love amongst its viewers with its upcoming story ‘Aaichi Sutti’. The story will revolve around the importance of a break for a housewife or a mother who is working round the clock for her family. Kishor Chaugule will play the role of the husband Divakar and Shruja Prabhudesai will essay the role of his wife Sarla.

Advertisement