महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत पंढरपूरच्या विठ्ठलाचं तिन्हीसांजेला दर्शन घडवणारी 'विठूमाऊली' ही स्टार प्रवाहची मालिका महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाली आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, गावांपासून शहरांपर्यंत सगळेच विठ्ठलभक्त 'विठूमाऊली' मालिकेमुळे विठूनामाचा गजर करत तल्लीन होत आहेत.

बिग बॉसचा पहिल्या दिवसाची सुरुवात जरा उशिराच झाली. हिंदी बिग बॉससारखीच मराठीच्या या पर्वाच्या दिवसाची सुरुवातदेखील गाण्याने झाली. बिग बॉसच्या नियमानुसार पहिल्याच दिवशी सगळं सामान घरातील सदस्यांना देता येत नाही. पहिला दिवस असल्यामुळे सगळेच आपल्या सामनाशिवाय रहात होते. चहा – पाण्याची आणि सकाळच्या नाशत्याची सोय बिग बॉसने करून ठेवली होती. गाणं वाजण्याअगोदर घरामधील बरेचसे सदस्य उठले होते. काही गप्पा मारत होते तर काही सकाळचा व्यायाम करत होते. जुई गडकरी हिने सगळ्यांसाठी नाश्ता बनविला. दिवस उशिरा सुरु झाल्याने दुपारचं जेवण देखील उशिराच झालं. मध्ये मध्ये होणाऱ्या गप्पांमध्ये मेघा धाडेने तिला स्वयंपाक करायला आणि किचनचे सामान लावायला खूप आवडते असे म्हंटले. जुईला जेवण तर येते पण तिच्या एका वाक्यावर सगळ्यांच हसू आले. “मला फक्त एका वेळी एकाच व्यक्तीसाठी चहा बनवता येतो. त्यामुळे १५ जणांसाठी मला चहा १५ वेळा बनवायला लागणार”.

बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची उत्सुकता आणि इच्छा प्रत्येकाची असते. पण ९० – १०० दिवस तिथे रहाणे हे काही सोपे नसते. घरच्यांना, आपल्या प्रिय व्यक्तींना मागे सोडून ईतके दिवस त्यांच्याशिवाय रहायचे काही सोपे नसते. कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या ग्रँड प्रीमियरला विनीत भोंडेची मंचावर एन्ट्री झाल्यानंतर त्याला एक सुंदर सरप्राईझ मिळाले. महेश मांजरेकर यांनी विनीत भोंडे यांच्या पत्नीला मंचावर बोलावले आणि विनिताला हे ऐकताच विश्वास बसेना पण, प्रत्यक्ष आपल्या पत्नीस मंचावर बघितल्यावर त्याला खूपच आनंद झाला. विनीत बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याअगोदर त्याची पत्नी खास त्याला भेटण्यासाठी बिग बॉसच्या मंचावर आली होती.

जगभरात खळबळ माजवणारा, अनेक देशांमधून करोडो प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळवलेला, संपूर्ण भारतामध्ये हुकुमत गाजवणारा कार्यक्रम म्हणजे “बिग बॉस” हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे १५ एप्रिलपासून कलर्स मराठीवर संध्या ७ वाजता आणि सोम ते शनि रात्री ९.३० वा तसेच रविवारी ९.०० वा. आपल्या मराठी भाषेमध्ये हा कार्यक्रम येत आहे हे कळल्यावर या कार्यक्रमबद्दलच्या बऱ्याच चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरु झाल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मांजरेकर करणार आहे. कार्यक्रमाच्या सेटपासून, स्पर्धक, यांच्याबद्दल बरीच गुप्तता राखली जात आहे. पण १५ एप्रिल रोजी संध्याकाळी या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर होणार असून, यामध्ये महेश मांजरेकर यांची धमाकेदार एन्ट्री होणार आहे, तसेच स्पर्धकांची नावे देखील प्रेक्षकांना कळणार आहेत.

लोकप्रियता आणि टीआरपीचा उच्चांक गाठलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मानत घर करून बसली आहेत. या मालिकेत नुकताच प्रेक्षकांनी राधिकाचा कायापालट पहिला. उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने पाहता पाहता स्वतःचे ऑफिस देखील चालू केले. मालिकेत झालेल्या सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरच्या एन्ट्रीने गुरुची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. येत्या रविवारी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात राधिका तिच्या सहकाऱ्यांसोबत शिर्डीला जाणार आहेत.

मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केले नाहीत तर म्युजिक, कॉमेडी आणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक शो टिव्हीवर सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या झी टॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचं प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळतआला आहे.

Advertisement