काळ कितीही बदलला तरीही घर सांभाळते ती स्त्री ! मुलांचं संगोपन, त्यांच्यांवर संस्कार करते ती स्त्री ! नवरा, सासरची माणसं सगळ्यांना साभांळून स्वत:ची अस्मिता जपते ती स्त्री ! घराला घरपण देते ती देखील स्त्रीच ! तरीही मर्यादांची बंधनं घातली जातात ती स्त्रीवर, बाईने बाईसारखं वागावं हे देखील तिच्याच मनावर बिंबवण्यात येतं अगदी लहानपणापासून ! नियमांची चौकट, परंपरांचं ओझं एका स्त्रीवर थोपवलेलं असतं तिच्याच घरच्यांनी, आपल्याच समाजानी आणि तिचं संपूर्ण आयुष्य ती जबाबदारी पार पाडण्यात जातं. परंतु हे चित्र आता बदलतं आहे, आत्ताची स्त्री तशी राहिलेली नाही तिला स्वत:ची मतं आहेत, विचार आहेत. परंतु स्त्रियांनी त्यांचे विचार मांडणे यालाच बऱ्याचदा विरोध केला जातो. विशेषत: स्त्री वर्गाचाच याला विरोध झालेला जास्त करून दिसून येतो. जेंव्हा आजच्या काळातील मुलगी आपले विचार मांडते तेंव्हा तिला बंडखोर म्हंटले जाते. अशाच परस्परविरोधी विचारसरणीतील द्वंद्व या कथासूत्रावर आधारित आणि युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित “कुंकू, टिकली आणि टॅटू” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. या मालिकेमध्ये गुरुराज अवधानी विष्णुपंत कुलकर्णी ही भूमिका साकारणार असून, सारिका निलाटकर – नवाथे विभा कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. यांच्यासोबत निवोदित भाग्यश्री न्हालवे, आदिश वैद्य, श्वेता पेंडसे, अमोल बावडेकर, राजेश देशपांडे, राजश्री निकम, प्रमुख भूमिकेत असणार आहेत.

धमाकेदार आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स सादर करून झी युवावरील लोकप्रिय डान्स रिऍलिटी शो डान्स महाराष्ट्र डान्स प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. सुपरहिट मराठी सिनेमा - गुलाबजामचे कलाकार, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर झी युवा वरील डान्स महाराष्ट्र डान्समध्ये येणार आहेत हे कळाल्यावर सर्वांच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती.

“घाडगे & सून” ही मालिका सुरु झाल्यापासूनच उत्तम कथानक, कलाकार यांमुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेने प्रेक्षकांना आपलेसे करून बघता बघता २०० भागांचा पल्ला गाठला आहे. घाडगे सदनमध्ये गुढीपाडवा आनंदात पार पडला. वसुधाच्या हाती लागलेल्या घटस्फोटाच्या कागदपत्रांनी आता ती नातं तोडेल का ही भीती अमृताच्या मनात अजूनही आहे. आता मालिकेमध्ये बऱ्याचश्या घटना बघायला मिळणार आहेत. कारण, घाडगे सदनमध्ये येणार आहेत जेजुरीच्या काकू. काकुंच्या येण्याने सगळ्यांचाच आनंद द्विगुणीत होणार हे नक्की. पण, वसुधाच्या मनामध्ये काही वेगळचं आहे. अमृता – अक्षयच्या नात्याला पूर्णत: तोडण्याच्या मनसुब्यामध्ये वसुधाला यश येणार का ? कि, काकुंच्या येण्याने अक्षय – अमृताच्या नव्या नात्याचा खऱ्या अर्थाने शुभारंभ होणार ? हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका “घाडगे & सून” सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

सध्या प्रेम आणि राधा समोर अनेक अडचणी आणि आव्हाने येत आहेत. एकीकडे दीपिकाची बळजबरी आणि दुसरीकडे राधाचा असलेला विश्वास तसेच आईला दिलेले वचन यामध्ये प्रेम पूर्णपणे अडकलेला आहे. आदित्य श्रावणी काकुच्या वारंवार अन्विताला घालून पाडून बोलण्याला कंटाळून आदित्यने तिला घराबाहेर काढले होते. राधा आणि प्रेमला हे कळताच ते श्रावणी काकुला शोधायला घराबाहेर पडतात आणि राधाच्या सांगण्यावरून श्रावणी काकु घरी येण्यास संमती देते आणि घरी येते देखील. पण, आता येणाऱ्या भागांमध्ये प्रेम आणि राधाच्या वाढत्या मैत्रीला लक्षात घेऊन दीपिका आणि तिची आई प्रेमला एका तासाची मुदत देणार आहेत. आता प्रेम कुठला मार्ग स्वीकारणार? आईला दिलेले वचन कसे पूर्ण करणार? राधाचा प्रेमवर असलेला विश्वास कायम रहाण्यासाठी प्रेम काय करणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका राधा प्रेम रंगी रंगली मालिकेचा महाएपिसोड २५ मार्च फक्त कलर्स मराठीवर.

कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाला तसेच कार्यक्रमामधील स्पर्धकांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. १५ स्पर्धकांबरोबर सुरु झालेल्या या प्रवासामध्ये स्पर्धकांना बरेच एकाही शिकायला मिळाले आता याच स्पर्धकांमधून फक्त ५ स्पर्धक अंतिम फेरीमध्ये पोहचले आहेत. “सूर नवा ध्यास नवा” कार्यक्रमाच्या मंचाला मिळाले आहेत अंतिम पाच शिलेदार त्यामुळे सुरांची स्पर्धा आता अजूनच रंगतदार होणार यात शंका नाही. शरयू दाते, प्रेसेनजीत कोसंबी, निहिरा जोशी देशपांडे, अनिरुध्द जोशी आणि विश्वजित बोरवणकर या स्पर्धकांमध्ये रंगणार आता गाण्याची मैफल आणि महाराष्ट्राला मिळणार नवीन सूर... तेंव्हा हि सुरांची मैफल, हे संगीत युध्द बघायला विसरू नका.

ज्या कार्यक्रमाची चर्चा फक्त देशातच नाही तर जगभरात असते, ज्याचं प्रत्येक पर्व प्रेक्षकांना नवीन अनुभव देणारं ठरतं, ज्या कार्यक्रमाने हिंदीतच नाही तर आपल्या प्रादेशिक भाषांमध्येही आपली हुकुमत कायम ठेवली असा रिअॅलिटी शोच्या दुनियेतील सर्वात उत्कंठावर्धक बिग बॉस कार्यक्रम आता आपल्या मराठीत सुरु होतो आहे. येत्या १५ एप्रिलपासून महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर म्हणजेच कलर्स मराठीवर बिग बॉसचं हे मराठमोळं रुप बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये कोण कोण असणार आणि मुख्य म्हणजे त्याचा सूत्रधार कोण असणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली होती. त्या प्रश्नाचं उत्तर आता प्रेक्षकांना मिळणार आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे आणि मराठीचा झेंडा ख-या अर्थाने साता समुद्रापार नेणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाच्या सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच काही विशेष प्रोमोमधून मांजरेकरांची ही नवी भूमिका प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Advertisement