कलर्स मराठीवरील लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये लक्ष्मीचा विवाह सोहळा तब्बल एक आठवडा रंगला. ज्यामध्ये बरेच चढ – उतार बघायला मिळाले. सर्व अडचणीवर मात करत आणि आजीच्या पाठिंब्यामुळे लक्ष्मी आणि मल्हारचे लग्न झाले आणि लक्ष्मी मामीच्या जाचामधून सुटली, त्यामुळे आजीला देखील आनंद झाला. येणाऱ्या काही भागांमध्ये प्रेक्षकांना मालिकेमध्ये बऱ्याच घटना बघायला मिळणार आहेत. तसेच मालिकेमध्ये आर्वी आणि लक्ष्मीची भेट अपघाताने होणार आहे. ज्यामधून हळूहळू त्या दोघींची मालिकेमध्ये चांगलीच गट्टी जमणार आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरु होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा होती. “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. सदस्यांच्या एकमताने नंदकिशोर, रेशम आणि सई हे तिघे या आठवड्याच्या कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी उभे राहिले. काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगले “चाल – वाटचाल” हे कॅप्टनसीचे कार्य. आज बघायला विसरू नका WEEKEND चा डाव महेश मांजरेकर यांच्यासोबत बिग बॉस मराठीमध्ये रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

स्टार प्रवाहच्या गोठ या लोकप्रिय मालिकेने ५०० भागांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. ५०० भाग पूर्ण केल्यानिमित्त मालिकेच्या सेटवर केक कापून जोरदार सेलिब्रेशनही करण्यात आलं. आता येत्या काही भागांमध्ये आणखी काही नवी वळणं येऊन मालिकेचं कथानक किती रंजक होतं हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

झी युवावरील 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचे प्रेम लाभले आणि त्यांच्या उदंड प्रतिसादानेच झी युवा 'संगीत सम्राट' या कार्यक्रमाचे २ रे पर्व घेऊन सज्ज झाले आहे. हे नवे पर्व नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीस आले. संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. या नव्या पर्वात स्पर्धक हे नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या टीम्सचा भाग असणार आहेत आणि या टीम्सचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे हरहुन्नरी गायक असणार आहे.

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बिग बॉस यांनी सोपवलेले “द ग्रेट डिक्टेटर” हे कार्य सुरु होते. ज्यामध्ये नंदकिशोर हुकुमशाह आणि घरातील इतर सदस्य प्रजा आहेत. परंतु मेघाला बिग बॉस कडून मिळालेल्या आदेशानुसार प्रजेने काल हुकुमशहा विरोधात बंड पुकारला. प्रजा हुकुमशहाच्या किमान पाच पोस्टरवर काळा रंग फासणे, हुकुमशहा यांचा पुतळा नष्ट करणे, हुकुमशहा यांच्या डोक्यावर पाणी ओतणे, हुकुमशहा यांच्यां विशेष रूममध्ये जाऊन स्मोक बॉम्ब फोडणे या बिग बॉस यांनी हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी दिलेल्या कार्यामध्ये यशस्वी ठरली. आणि त्यामुळेच “द ग्रेट डिक्टेटर” या कार्यामध्ये प्रजा विजयी ठरली. आता बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन कोण होणार ? हे बघणे रंजक असणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. डॉ. निलेश साबळे कॅप्टन ऑफ द शिप तर श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके ही तगडी विनोदवीरांची फौज असलेला 'चला हवा येऊ द्या' हा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक विनोदवीर प्रेक्षकांना खळखळून हसवण्याचे प्रामाणिक काम करतात. सोमवारी आणि मंगळवारी रात्री साडे नऊ वाजता छोट्या पडद्यावर दाखल होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी स्ट्रेस बस्टरचे काम करतो. 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर थुकरटवाडीतील मंडळी कधी काय करतील याचा काही नेम नाही.

Advertisement