झी युवाने अहमदनगर मध्ये राहणाऱ्या पूर्वा आणि पराग यांच्या मोडलेल्या लग्नाची आणि जुळलेल्या प्रेमाची गोष्ट 'कट्टी बट्टी' प्रेक्षकांच्या भेटीस आणली. मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि लग्न मोडल्यानंतर पराग आणि पूर्वाच्या वाटा वेगळ्या वेगळ्या झाल्या. सध्या अनुष्का आणि परागची लगीनघाई प्रेक्षक पाहत आहेत. दुसरीकडे पूर्वाला मात्र परागसाठी काहीतरी वाटतंय पण ती कोणालाच सांगू शकत नाहीये.

झी युवा ही वाहिनी आता एका रंजक पण भावनिक विषयावर आधारित 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी ६ ऑगस्टपासून सादर करणार आहे. कुटुंबात येणाऱ्या एका नव्या पाहुण्याची उत्सुकता असते आणि त्यातून येणारी आव्हाने आणि जबाबदारीतून प्रत्येक पालकांना जावे लागतेच. मुलांची काळजी कशी घ्यावी याविषयी नवीन पालकांचे प्रबोधन करण्यात 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम महत्वाची भूमिका निभावणार आहे.

स्टार प्रवाहवर ६ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘ललित २०५’ या मालिकेचा लॉन्चिंग सोहळा नुकताच संपन्न झाला. निमित्त होतं ते सुमित्रा आजीच्या ७०व्या वाढदिवसाचं. संपूर्ण राजाध्यक्ष कुटुंबाने एकत्र येत लाडक्या आजीचा वाढदिवस थाटात साजरा केला. आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शनने या मालिकेची निर्मिती केलीय. या खास कार्यक्रमाला संपूर्ण बांदेकर कुटुंब हजर होतं.

विविध विषय आणि सादरीकरणातील नावीन्याने अगदी कमी वेळातच झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. कॉलेज मधील सोनेरी दिवस ते फॅमिली ड्रामा सादर करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी हि वाहिनी आता एका रंजक पण भावनिक विषयावर आधारित 'स्पर्श वात्सल्याचा' हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे.

आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. मालिकेत विवेक सांगळे आदित्यची भूमिका साकारत आहेत. नुकतेच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की अक्षयच्या ढोंगी स्वभाव सगळ्यांसमोर उघडकीस येतो आणि मीरा व अक्षयच लग्न तुटतं. मीरा जरी उदास असली तरी आदित्य तिला पुरेपूर आधार देतो आणि प्रेक्षक सध्या मालिकेत आदित्य आणि मीरा यांची वाढती मैत्री पाहत आहेत.

कवयित्री विमल लिमये यांची "घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती" ही कविता प्रसिद्ध आहे. या कवितेतील विचार खरा करणारी, नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी मालिका 'ललित २०५' स्टार प्रवाह घेऊन येत आहे. उत्तम स्टारकास्ट असलेली ही मालिका ६ ऑगस्टपासून रात्री ८.३० वाजता पाहता येणार आहे.

Advertisement